बेल्हयात सरपंचपदासाठी सर्वाधिक तब्बल २६ अर्ज दाखल; बेल्हे ग्रामपंचायतीत चुरस वाढली

1 min read

जुन्नर दि.१९:- जुन्नर तालुक्यातील निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी गुरुवारी (दि.१९) पर्यंत १०२ उमेदवारांनी १०४ सरपंच पदासाठी अर्ज केले आहेत. यात सर्वाधिक २६ अर्ज बेल्हे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी दाखल झाले आहेत.

या मध्ये सरपंच पदासाठी पांगरी तर्फे मढ २ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत तर उंब्रज नंबर एक ७ अर्ज , पिंपरी कावळ १, बेल्हे २६, तांबेवाडी (शून्य), बांगरवाडी ३, रानमळावाडी ४, गुळुंचवाडी ३ , गुंजाळवाडी ३, शिरोली तर्फे आळे २,

नारायणगाव ४, कांदळी ६, पारुंडे ५, बुचकेवाडी ४, सुकाळवेढे ३, पाडळी ५, राळेगण १, धालेवाडी तर्फे मिनेर १, खामगाव १, खटकाळे ५, निमगिरी ६, पिंपळवंडी ३,

वडगाव आनंद (शून्य), डुंबरवाडी २, आंबेगव्हाण २, सांगनोरे ५, असे एकूण १०४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अशी माहिती तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी दिली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे