जुन्नरमध्ये सरपंचपदासाठी ६० उमेदवारी अर्ज दाखल; बेल्हे ग्रामपंचायतीसाठी सर्वाधिक अर्ज
1 min readजुन्नर दि.१९:- तालुक्यातील निवडणूक होत असलेल्या २६ पैकी १५ ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी (दि. १८) ४६ जणांनी ४८ अर्ज दाखल केले. यात सर्वाधिक २२ अर्ज बेल्हे ग्रामपंचायतीसाठी दाखल झाले आहेत. एकूण अर्जाची संख्या ६० झाली असल्याचे तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी सांगितले. सांगणोरे, आंबेगव्हाण, डुंबरवाडी, राळेगण, पाडळी, बुचकेवाडी, शिरोलीतर्फे आळे, गुळंचवाडी येथे प्रत्येकी एक, निमगिरी, खटकाळे, उंब्रज नंबर एक व नारायणगावला प्रत्येकी तीन, गुंजाळवाडी (बेल्हे) व बांगरवाडी प्रत्येकी दोन अर्ज दाखल झाले. सदस्यपदासाठी १०२ जणांनी अर्ज दाखल केले आहेत.