सरपंच पदासाठी जुन्नर तालुक्यात १२ तर सदस्य पदासाठी १७ अर्ज दाखल
1 min readजुन्नर दि. १८ :- जुन्नर तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या असून मंगळवार अखेर (दि.१७) सरपंचपदासाठी ८ गावांतील १२ अर्ज दाखल झाले आहे. या आठ गावांमध्ये पारुंडे (४), रानमळा (२) तसेच पिंपळवंडी, पाडळी, गुळंचवाडी, बेल्हे, उंब्रज नं-१, कांदळी येथून प्रत्येकी एक अर्ज दाखल झाला आहे. तर सदस्य पदाच्या उमेदवारीसाठी ४ गावांतून १७ अर्ज दाखल झाले. यापैकी सर्वाधिक १० अर्ज पारुंडे गावातून दाखल झाले असून पिंपळवंडी (३), रानमळा (३) व खामगाव (१) येथूनही अर्ज दाखल झाले आहेत.नामनिर्देशनासोबत सादर करण्यात येणारे घोषणापत्र संगणक प्रणालीद्वारे भरले जात आहे; मात्र त्याची प्रिंट काढताना तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने नामनिर्देशनाची मुदत सायंकाळी ५.३० पर्यंत वाढवली आहे, अशी माहिती तहसीलदार रविंद्र सबनीस यांनी दिली.