रानमळावाडी ग्रामपंचायत निवडणुक राजकारण तापल; गावात वाहतात बदलाचे वारे

1 min read

बेल्हे दि.१३:- रानमळावाडी (ता.जुन्नर) ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा उडत असून गावात गुप्त बैठका व पॅनल बांधणी अंतिम टप्प्यात आहे. गावचे वातावरण बदलले असून गावात यंदा परिवर्तन होण्याचे वारे वाहू लागले आहेत.

हे लहान गाव असल तरी येथील राजकारण यंदा चांगलंच तापलं दिसून येत आहे. गेल्या पंचवार्षिक मध्ये मच्छिंद्र (पप्पू) गुंजाळ यांचा जय मल्हार परिवर्तन सर्वपक्षीय पॅनल व राष्ट्रवादी पुरस्कृत सुरेश तीकोने यांचा खंडेश्वर ग्राम विकास पॅनल यांच्यात दुरंगी लढत झाली होती. ही निवडणूक चुरशीची होऊन यामधे सुरेश तिकोने यांचा विजय झाला होता तर मच्छिंद्र (पप्पू) गुंजाळ यांना फक्त ४० मतांनी हार पत्करावी लागली होती.

यंदा सरपंच पदासाठी सर्वसाधारण मागास प्रवर्ग आरक्षण असून एकूण ७ जागा व सरपंच पदासाठी एक अशा ८ जगांसाठी ही लढत होत आहे. गावात तीन वार्ड असून वार्ड क्रमांक एक मध्ये ४३३ मतदार असून त्यापैकी दोन ओपन महिला राखीव व एक ओपन पुरुष आरक्षित आहेत. एक वार्ड क्रमांक दोन मध्ये ४७९ मतदार असून एक महिला सर्वसाधारण व एक ओपन पुरुष आहे.

तर वार्ड क्रमांक तीन मध्ये ४९६ मतदार असून एक महिला सर्वसाधारण तर एक सर्व साधारण पुरुष असे एकूण ३ पुरुष व ४ महिला ग्रामपंचायत लढणार आहेत. यावर्षी पॅनल बनवण्याच्या हालचाली सुरू असून दुरंगी लढत होणार असल्याचे चित्र समोर दिसत आहे. अद्याप पॅनल ची नावे समोर आली नसली तरी उमेदवारांची चाचपणी सुरू असल्याच्याही चर्चा आहेत.

सर्वपक्षीय पॅनल मध्ये पॅनल प्रमुख मच्छिंद्र (पप्पू) गुंजाळ, सीए सावकार गुंजाळ, भाऊ भागा गुंजाळ, कैलास गुंजाळ या चौघांचा पॅनल तर राष्ट्रवादी पुरस्कृत सुरेश तीकोने यांचा पॅनल यात दुरंगी लढत होण्याची चर्चा आहे. परंतु अद्याप दोन्ही पॅनल प्रमुखांचे उमेदवार फायनल करण्याचं काम जोरात चालल असून यंदाची निवडणूक मात्र लक्षवेधी ठरणार असल्याचं बोलल जात असून बदलाचे वारे वाहू लागले आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे