गुंजाळवाडी ग्रामपंचायत निडणुकीचा धुरळा; गुप्त बैठका सुरू; वातावरण तापल; यंदा ची निवडणूक ठरणार लक्षवेधी

1 min read

बेल्हे दि.११:- गुंजाळवाडी (ता.जुन्नर) ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा उडत असून गावात गुप्त बैठका व पॅनल बांधणी जोरात सुरू आहे. हे लहान गाव असल तरी येथील राजकारण नेहमीच चांगलंच तापलं दिसत. गेल्या पंचवार्षिक मध्ये किसन बोरचटे यांच्या (सर्वपक्षीय) मुक्ताबाई परिवर्तन पॅनल व राष्ट्रवादी पुरस्कृत लहू गुंजाळ यांचा मुक्ताई पॅनल यात दुरंगी लढत झाली होती. मुक्ताई पॅनल ने एक हाती सत्ता मिळवत सर्व जागा जिंकून लहू गुंजाळ हे लोकनियुक्त सरपंच झाले होते. यंदा सरपंच पदासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण असून एकूण नऊ जागांसाठी ही लढत होत असते. तीन वार्ड असून प्रत्येक वार्ड मधून तीन सदस्य आहेत. वार्ड क्रमांक एक मध्ये ४५४ मतदार असून त्यापैकी दोन ओपन महिला राखीव व एक ओपन पुरुष आरक्षित आहेत. एक वार्ड क्रमांक दोन मध्ये ५२० मतदार असून एक महिला राखीव व दोन ओपन पुरुष आहेत तर वार्ड क्रमांक तीन मध्ये ४९१ मतदार असून दोन महिला राखीव तर एक ओपन पुरुष असे एकूण ४ पुरुष व ५ महिला ग्रामपंचायत लढतात. यावर्षी पॅनल बनवण्याच्या हालचाली सुरू असून दुरंगी लढत होणार असल्याचे चित्र समोर दिसत आहे. अद्याप पॅनल ची नावे समोर आली असती तरी उमेदवाराची चाचपणी सुरू असल्याच्याही चर्चा आहेत. या पंचवार्षिक मध्ये लहू गुंजाळ यांचा राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनल व संजय बोरचटे यांचा (सर्व पक्ष पुरस्कृत) पॅनल यामध्ये दुरंगी लढत होण्याची चर्चा आहे. परंतु अद्याप दोन्ही पॅनल प्रमुखांचे उमेदवार फायनल करण्याचं काम जोरात चालल असून यंदाची निवडणूक मात्र लक्षवेधी ठरणार असल्याचं बोलल जात आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे