जुन्नर तालुक्यात मिटिंगमध्ये शिक्षकांची हाणामारी; २२ शिक्षकांवर गुन्हा दाखल; अटक पूर्व जामिनासाठी शिक्षकांची धावपळ

1 min read

जुन्नर दि.१९:- जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या मासिक मिटिंगमध्ये शिक्षक संचालकांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याचा प्रकार घडला घडला आहे. अॅट्रॉसिटीसह इतर कलमानुसार २२ शिक्षकांवर जुन्नर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.सविता कुऱ्हाडे (रा. आळे), बाळू लांगी (रा. करंजाळे), दिलीप लोहकरे (रा. बारव, जुन्नर) या शिक्षकांनी परस्परविरोधी फिर्यादी दिल्या आहेत. त्यानुसार नानाभाऊ कणसे, सुनीता वामन, पूनम तांबे, सुभाष दाते, विवेकानंद दिवेकर, अविनाश शिंगोटे, ज्ञानेश्वर मोढवे, प्रमोद मोजाड, संदीप पुरवंत, ज्ञानेश्वर गवारी, दिलीप लोहकरे, विजय कुन्हाडे, बाळू लांगी, विजयकुऱ्हाडे, सविता कुऱ्हाडे, विजय लोखंडे, दत्तात्रय घोडे, अंबादास वामन, सचिन मुळे, संतोष पाडेकर, जितेंद्र मोरे, अनिल कुटे या शिक्षकांवर गुन्हे दाखल झाले आहेत.सविता यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शिक्षक पतसंस्थेची मासिक मिटिंग सुरू असताना विजय कुऱ्हाडे हे मोबाईलवर शूटिंग काढत होते. शूटिंग का काढता, अशी विचारणा केली असता त्यांनी सविता यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. तर, कर्ज वाटप नियमबाह्य झालेली आहेत, असे बाळू लांगी यांनी म्हटल्याने त्यांना बोलण्यास विरोध करून. १९ शिक्षकांनी त्यांना मारहाण करीत जातीवाचक बोलून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून नेली. दिलीप लोहोकरे यांना दोन शिक्षकांनी शिवीगाळ करून सोन्याची चेन हिसकावून नेली. जुन्नर DYSP रवींद्र चौधर, पोलीस उपनिरीक्षक संदीप पर्वते तपास करीत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे