आळेफाटा पोलिसांनी पकडला ९ लाख ५४ हजार रुपयांचा गुटखा
1 min readआळेफाटा दि.१:- गुजरात गुटख्याची तस्करी करणाऱ्या ट्रक चालकाला आळेफाटा पोलिसांनी ताब्यात घेतली असून 29 लाख 54 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.या बाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि.३१/१०/२०२३ रोजी पोलीसांना गोपनिय बातमी मिळाली की, गाडी क्रमांक GJ 03 AT 3510 यामधून बेकायदा गुटखाची वाहतुक होणार असून सदर ट्रक हा गुजरातहून पुण्याकडे जाणार आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने, त्याअनुषंघाने फाऊंटन हॉटेल समोर पोलीस उपनिरीक्षक रागिनी कराळे, पो.कॉ माळुजे, पो.कॉ अरगडे, पो.कॉ ढोबळे, पो. कॉ. आमले असे नाकाबंदी करीत असताना, एक अशोक लेलंट कंपनीचा ट्रक क्रमांक GJ 03 AT 3510 हा संशयीत रित्या मिळून आल्याने सदर ट्रक चालकास त्याचे नाव व पत्ता विचारून त्याच्याकडे चौकशी केली असता. तो उडवाउडवीचे उत्तरे देवू लागल्याने सदरचा ट्रक चेक केला असता, त्यामध्ये विनापरवाना, बेकायदेशीर रित्या १) विमल कंपनीची सुगंधित सुपारीची २० खाकी पोते, २) निळया कलरचे एकुण ०४ पोते त्यामध्ये तंबाखु, असा एकुण ०९,५४,००८/- रूपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने सदरबाबत मा. सह मा. सह आयुक्त (अन्न) सो, अन्न व औषध प्रशासन महा. राज्य स्पाईन रोड, मोशी, पुणे यांना कळवून त्यांनी दिलेल्या. फिर्यादीवरून आरोपी नामे अल्ताफ नरमम्मद शेखा (वय ४३ वर्षे व्यवसाय चालक रा. मोती बाजार, गोंदल ता. गोंदल जि.राजकोट,राज्य गुजरात) याच्याविरूध्द अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे असून त्याच्याकडून एकुण २९,५४,००८/- रूपये किंमतीचा मुद्देमाल ट्रकसह जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी ही मा. श्री अंकीत गोयल सो पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण मा. मितेश घट्टे सो अपर पोलीस अधिक्षक पुणे विभाग मा.रविंद्र चौधर सो उपविभागीय पोलीस अधिकारी सो जुन्नर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल बडगुजर, पो.स. ई. रागिनी कराळे पो.हवा विनोद गायकवाड, पो.हवा आव्हाड, पो. कॉ. अमित माळुजे, पो कॉ नवीन अरगडे, पो कॉ हनुमंत ढोबळे, पो. कॉ. आमले यांनी केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल बडगुजर हे करीत आहेत.