आळेफाटा पोलीसांनी पकडला ३१ लाख रुपयांचा गुटखा; आठवड्यात दुसरी कारवाई

1 min read

आळेफाटा दि.३:- याबाबत आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार गुजरात हुन पुण्याकडे बेकायदा गुटख्याची वहातुक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांणी पुणे- नाशिक महामार्गावरील आळे (ता.जुन्नर) गावच्या हद्दीत डोंगरे फर्निचर या दुकानासमोर नाकाबंदी केली असता. गुजरात हून आलेला एम.एच.१७ के.ए.९७१७ हा टेम्पो पोलीसांना संशयीत रित्या आढळुन आल्याने टेंम्पो चालकाची चौकशी केली असता त्याने उडवा उडवी ची उत्तरे दिल्यानंतर सदरचा टेंम्पो चेक केला असता त्यामध्ये विनापरवाना, बेकायदेशीर रित्या प्रतिबंधित असलेला विमल कंपणीची सुगंधित सुपारी, सुगंधित तंबाखू व आर.एम.डी. नावाची सुगंधित सुपारी असा. एकुन ३१ लाख ४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने टेम्पो चाऊलक ओंकार हिरामण सांडभोर (वय २२ राहणार सांडभोर वाडी या. राजगुरूनगर जि.पुणे) याच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असुन ४६ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल टेंम्पो ट्रक सह जप्त करण्यात आला आहे.सदरची कामगिरी पुणे ग्रामीण चे पोलीस अधिक्षक अंकीत गोयल,अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर,अनिल पवार, सहा‌फौजदार चंद्रशेखर डुंबरे,विनोद गायकवाड, प्रल्हाद आव्हाड,पंकज पारखे,अमीत माळुंजे,नवीन अरगडे,हनुमंत ढोबळे,राजेंद्र आमले,पोलीस मित्र नामदेव पानसरे यांनी केली .पुढील तपास सुनील बडगुजर हे करत आहेत .दरम्यान दोनच दिवसांपुर्वी गुजरात हुन पुण्याकडे आलेला ९ लाख रुपयांचा गुटखा आळेफाटा पोलिसांणी पकडलेला असताना आज पुन्हा आळेफाटा पोलिसांणी ३० लाख रुपयांचा गुटखा पकडल्याने पोलीसांचे कौतुक होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे