नळवणे येथे दरोडा टाकणारे तिघे आळेफाटा पोलिसांनी केले जेरबंद; चोरीचे दागिने हस्तगत

1 min read

नळवणे दि.७ :- नळवणे (ता.जुन्नर) या ठिकाणी चोरट्यांनी दरोडा टाकुन सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेल्याची घटना मार्च महिन्यात घडली होती.या संदर्भात वैशाली दत्तात्रेय साबळे (वय 45 वर्ष) धंदा शेती राहणार बेडकी मळा नळवणे तालुका जुन्नर यांनी आळेफाटा पोलिसांत दिली होती.

या गुन्ह्याती आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले असून गणेश सुरेश भोसले (राहणार वाळुंज वय 30 तालुका आष्टी जिल्हा बीड, सध्या राहणार शंभू डोंगर निघोज तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर), अजय साधीश काळे (वय 20 वर्ष राहणार वाळुंज तालुका जिल्हा अहमदनगर) व किरण भाऊसाहेब बेंद्रे (वय 33 वर्ष व्यवसाय सोनार राहणार वाळुंज तालुका जिल्हा अहमदनगर) हे तिघे जेरबंद केले आहेत.

त्यांच्या कडून 1,25,000/-₹ किमतीचे 2.5 तोळे वजनाचे मनी मंगळसूत्र, 60,000/-₹ किमतीचे 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, 21,0000/-₹ किमतीचे 3.5 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या कानातील कुड्या, 2500/-₹

किमतीचे पायात असणारे 2.5 भार वजनाच्या चांदीच्या पट्ट्या सदर दरोड्याचे गुन्ह्यातील जप्त मुद्द्यमाल मंगळवार दि.७ रोजी फिर्यादी वैशाली साबळे यांना पोलीस स्टेशनला बोलून घेऊन कोर्टाच्या आदेश नुसार मुद्देमाल फिर्यादी यांच्या ताब्यात देण्यात आला.

फिर्यादी यांनी त्याबाबत समाधान व्यक्त केले असून पोलिसांचे आभार आणले.सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे. अशी माहिती आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी दिली.

याबाबत घडलेला घटनाक्रम असा की, नळवणे (ता.जुन्नर) येथील तात्पुरत्या बनवलेल्या खोलीत दत्तात्रय साबळे व त्यांच्या पत्नी वैशाली साबळे हे मंगळवार दि.७ मार्च २०२३ रोजी रात्री जेवन करून झोपले असता रात्री १० वाजण्याच्या सुमारास पाच अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून साबळे यांणा लोखंडी पाईप ने मारहाण करत खिशात असलेले पैसे,दागिने हजार रुपये काढुन घेतले.

तसेच चोरट्यांनी हे करत असताना या दोघांनाही मोठ्या प्रमाणावर मारहाण करत त्यांच्या अंगावर पांघरून टाकले व या ठिकाणाहुन उठला तर जिवे मारुन टाकु असा दम दिला. या दोघांना मोठ्या प्रमाणात मारहाण झाल्याने नारायणगाव या ठिकाणी त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे