आळेफाटा उपबाजारात कांद्यास ४७५ रूपये बाजारभाव 

1 min read

आळेफाटा दि.१७:- आळेफाटा (ता.जुन्नर) येथील उपबाजारात आज मंगळवार दि.१७ रोजी कांद्याच्या १६१५२ कांदा पिशवी ची आवक झाली असुन एक नंबर कांद्यास दहा किलोला ४७५ रूपये बाजारभाव मिळाला आहे.

जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा या ठिकाणी झालेल्या नीलावात एक नंबर गोळा कांद्यास दहा किलोस ४११ ते ४७५ रूपये बाजार भाव मिळाला तसेच एक नंबर सुपर गोळे कांद्यास ३८० ते ४११ बाजारभाव मिळाला‌‌.

सुपर मिडीयम दोन नंबर कांद्यास ३०० ते ३८० रूपये बाजारभाव मिळला. तर तिन नंबर कांद्यास दहा किलोस २५० ते ३०० रूपये बाजारभाव मिळाला तर चिंगळी कांद्यास दहा किलोस ८० ते २०० रूपये बाजार भाव मिळाला तसेच मिडीयम कांद्यास दहा किलोस २२५ ते ३११ रुपये बाजारभाव मिळाला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे