रोटरी क्लब ऑफ आळेफाटा सेन्ट्रल यांचे तर्फे गरजू व गरीब विद्यार्थ्यांना सायकल वाटप

1 min read

आळेफाटा दि.१७ :-सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या रोटरी क्लब ऑफ आळेफाटा सेन्ट्रल यांनी आळेफाटा (ता.जुन्नर) येथील श्री शिवछत्रपती हायस्कूल येथे जुन्नर तालुक्यातील गरीब व गरजू विद्यार्थ्याना विविध वस्तूंचे वाटप केले.

 यामध्ये वरखेड येथील शाळेतील विध्यार्थ्यांना दप्तरे, वह्या, कंपास पेटी या वस्तूंचे वाटप तर आणे येथील भाऊसाहेब बोरा अश्रामशाळेसाठी ११ सायकली व ज्ञानदा माध्यमिक विद्यालय मंगरूळ या शाळेतील विद्यार्थ्यांना १८ सायकली, तसेच आळे येथील प्रगती गुंजाळ या गरीब मुलीस १ सायकल, ह्याप्पी स्कूल अंतर्गत छत्रपती हायस्कूल आळेफाटा येथे टोयलेट ब्लॉक चे उद्घाटन करण्यात आले.

तसेच पेठ ता.आंबेगाव येथील ५ अंगणवाड्यांस ५ वॉटर प्युरीफाइड देण्यात आले.सदर कार्येक्रमाच्या प्रसंगी रोटरी कल्बच्या डीस्ट्रीक गवर्नर मंजू फडके, अध्यक्ष विजयकुमार आहेर ,उपाध्यक्ष संभाजी हाडवळे, सेक्रेटरी पराग गांधी, संस्थापक महावीर पोखरणा, हेमंत वाव्हळ, पंकज चांगेडीया, ज्ञानेश जाधव व सर्व सदस्य छत्रपती शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक कर्मचारी वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर कार्यक्रमास कळंब ता-आंबेगाव येथील कळमजा माता विध्याल्याचे १९९५ च्या माजी विद्यर्थी केतन भालेराव, साईनाथ डोके, राजेश ढवळे , तुषार शिंदे ,अंकुश शिंदे यांनी या कार्यक्रमास देणगी स्वरुपात मदत केली.

तर धनंजय राजूरकर यांनी ह्याप्पी स्कूलसाठी मोलाचे सहकार्य केले. यावेळी मंजू फडके व अध्यक्ष विजयकुमार आहेर यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले. यावेळी विमलेश गांधी यांनी प्रस्तावना व पराग गांधी सर्वांचे आभार व्यक्त केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे