श्री पांडुरंग सार्वजनिक वाचनालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
1 min read
निमगाव सावा दि.१८:- श्री पांडुरंग सार्वजनिक वाचनालय निमगाव सावा व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बागवाडी (ता.जुन्नर) आयोजित भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती हा दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून किसन गाडगे यांच्या हस्ते डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. वाचनालयाचे अध्यक्ष निजाम पटेल यांनी पुष्पहार अर्पण केला व पूजन केले. त्यानंतर शाळेच्या वतीने उपस्थित सर्वांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी वाचनालयाचे सदस्य संजय उनवणे व सखाहरी खाडे यांनी भारतरत्न डॉ.अब्दुल कलाम यांच्या विषयी विद्यार्थ्यांना थोडक्यात माहिती सांगितली. त्यांनी कोणती पुस्तके लिहिली त्यांचे जीवन कार्य याविषयी अतिशय उत्कृष्ट अशी माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली.
त्यापासून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी जीवनात गुरुजनांची व आई-वडिलांची आज्ञा पाळावी असे सांगितले. त्यानंतर रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धेमधील इयत्ता पहिली ते चौथी मधील प्रत्येकी प्रथम तीन क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व परीक्षा पॅडचे वाटप करण्यात आले. नंतर स्पर्धेतील सहभागी सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा पॅडचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमासाठी उपस्थितामध्ये वाचनालयाचे अध्यक्ष निजाम पटेल, उपाध्यक्ष नवनाथ गाडगे, मुख्याध्यापक तानाजी जाधव बागवाडी शाळा, सुनीता औटी, किसन नाथा गाडगे, संजय उनवणे, शंकर गाडगे, सखाहरी महाराज खाडे, दत्ता बेल्हेकर,ग्रंथपाल पंढरीनाथ घोडे, अनिता गाडगे, तारा गाडगे इ. मान्यवर उपस्थित होते.