आळेफाटा येथे १८३ गरजूंची नेत्र तपासणी; ४० जणांना वर होणार मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया  

1 min read

आळेफाटा दि.१५ :- रोटरी क्लब ऑफ आळेफाटा मेन, ओम चैतन्य हॉस्पिटल आळेफाटा व आर. झुनझुनवाला शंकरा हॉस्पिटल पनवेल यांचे संयुक्त विद्यमाने आळेफाटा (ता.जुन्नर) येथील ओम चैतन्य हॉस्पिटल येथे भव्य मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर नुकतेच संपन्न झाले.

या शिबिरात परिसरातील सुमारे १८३ गरजूंची तपासणी करण्यात आली. त्यातील ४० जणांना मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पनवेल येथे नेण्यात आले. डॉ. प्रकाश पाटील पनवेल, डॉ. प्रदीप गुंजाळ, डॉ.वसंत पाटील, डॉ.तुषार झोपे, डॉक्टर संजय दुबे,डॉ. नागेश हिंगमिरे यांनी तपासणीसाठी विशेष सहकार्य केले.

सदर शिबिर संपन्न होण्यासाठी रोटरी क्लब ऑफ आळेफाटा मेन चे अध्यक्ष रो. मोहन पाटील भुजबळ, रो. शिवाजी गोरे, रो. संपत रहाणे, रो. मोहन जाधव, रो.सुधीर नरवडे,

रो.राजेंद्र बोराडे, रो.संदीप वाघोले, रो.भीमाशंकर आवटे, रो.गणेश मेहेर यांनी विशेष परिश्रम घेतले. विघ्नहर सुपर मार्केटचे रो.शुभम ढमाले यांनी शिबिरासाठी विशेष जाहिरात सौजन्य दिले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे