रोटरी क्लब ऑफ आळेफाटा मेन व ओम चैतन्य हॉस्पिटल, आळेफाटा आणि आर. झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबीर

1 min read

आळेफाटा दि.१४:- रोटरी क्लब ऑफ आळेफाटा मेन व ओम चैतन्य हॉस्पिटल, आळेफाटा आणि आर. झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल, नविन पनवेल (मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने रस्त्यावरील अपघात टाळुन आपले आयुष्य सुरक्षित करण्यासाठी आळेफाटा (ता.जुन्नर) येथील ओम चैतन्य हॉस्पिटल मध्ये मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि.१५ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते २ या वेळेत शिबिर असून नाव नोंदणीकरीता संपर्क खालील क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. रो.मोहन पाटील भुजबळ (अध्यक्ष) मो. ७५८८०३१९००, डॉ. संजय दुबे मो. ९७६७१०२२१०,

रो. शिवाजी गोरे सर (सचिव) मो. ९८६०१५४६५४, रो. राजेंद्र बो-हाडे मो. ९८९००९३३७१, रो. संपत रहाणे (आय.पी.पी.) मो. ९५११७०३७१६, रो. मोहन जाधव मो. ८८३०३४९१३९.या शिबिरासाठी आळेफाटा येथील प्रसिद्ध विघ्नहर सुपर मार्केट यांचे सौजन्य लाभले आहे. शिबिरात मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या रुग्णांनी येताना सोबत आधारकार्ड व रेशनकार्ड झेरॉक्स प्रत घेऊन यावी तसेच मधुमेह व रक्तदाब (बी.पी.) औषधे सुरु असल्यास ती देखील घेऊन यावीत. तसेच पेशंटला ऑपरेशनसाठी जाण्याची, राहण्याची, जेवणाची व परत आणून सोडण्याची मोफत सोय केली जाईल.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे