राजुरीमध्ये आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना कार्ड नोंदणी अभियान यशस्वी

1 min read

राजुरी दि.९:- शासन निर्देशाप्रमाणे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेसाठी राजुरीमध्ये समर्थ रुरल एज्युकेशन इन्स्टिट्युट व ग्रामपंचायत राजुरी यांच्या संयुक्त विद्यमाने नोंदणी अभियान घेण्यात आले. ग्रामपंचायत स्तरावर सदर अभियानाचे नियोजन केले. असुन गावातील विविध वाड्यावस्त्यांवर एकुण 20 ठिकाणी समर्थ कॉलेज ऑफ इंजिनीरिंग व समर्थ इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी ह्या महाविद्यालयातील 60 राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थ्यांना मार्फत सदर अभियानात १ हजार १३७ लाभार्थ्यांनी सहभाग नोंदवुन आपले आरोग्य कार्ड काढले.

सदर अभियानाची सुरूवात जुन्नर तालुक्याचे नव्याने नियुक्त झालेले गटविकास अधिकारी हेमंत गरीबे यांच्या शुभहस्ते झाली. प्रसंगी राजुरी गाच्या सरपंच प्रिया हाडवळे, उपसरपंच माउली शेळके, सदस्य रंगनाथ औटी, सखाराम गाडेकर, गौरव घंगाळे, शाकिरभाई चौगुले, माजी उपसरपंच मोहन हाडवळे, संदिप औटी, अनिल रायकर, निलेश हाडवळे, राजेश कणसे, सचिन गटकळ, अमोल हाडवळे, स्वप्नील हाडवळे.साईनाथ हाडवळे, मच्छिंद्र हाडवळे, गणेश हाडवळे , तलाठी धनाजीराव भोसले, ग्रामविकास अधिकारी एस आर बाळसराफ, समर्थ शैक्षणिक संकुलाचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.दिघे बी.एन , भालेकर प्रा.एस.एम. , प्रा.नागरे एन.बी. ग्रामपंचायत कर्मचारी, आशा सुपरवायर रुपाली नायकोडी , सर्व आशा कार्यकर्त्या.अंगणवाडी सेविका , प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचारी , समर्थ इंजिनिअरींग कॉलेज व फार्मसी कॉलेजचे विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.आरोग्य विभागामार्फत प्रथम हे कार्ड नोंदवण्याचे प्रशिक्षण सर्व विद्यार्थ्यांना वैभव हाडवळे व आशा सुपरवायझर रुपाली नायकोडी यांनी दिले.सदर कार्ड काढण्याचा उद्देश व त्याचा फायदा ग्रामस्थांना कश्या स्वरुपात होणार आहे. याबाबत सविस्तर माहीती मा.गरिबे यांनी उपस्थितीनां दिली.या मोहीमेत जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी सहभाग घेऊन आपले आरोग्य कार्ड नोंदवावे असे आवाहन गावाच्या सरपंच प्रिया हाडवळे यांनी सर्व ग्रामस्थांना केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष सहकार्य केल्याबद्धल राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.दिघे सर यांचा सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामविकास अधिकारी
बाळसराफ यांनी केले.तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे उपसरपंच माउली शेळके यांनी आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे