जुन्नरच्या गटविकास अधिकारीपदी हेमंत गरीबे यांची निवड

जुन्नर, दि.८ – जुन्नर तालुका पंचायत समितीच्या गटविकास अधिकारीपदी हेमंत गरीबे यांची निवड झाली आहे. यापूर्वी गरीबे यांनी जुन्नरसह आंबेगाव, शिरूर आदी ठिकाणी जबाबदारी पार पाडली होती.त्यांनी जुन्नर पंचायत समितीमध्ये सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून ३ वर्षे कामकाज पाहिले आहे. स्पष्टवक्तेपणा कर्तव्यदक्ष अधिकारी आणि कर्तव्यदक्ष असा लौकिक असलेल्या गरिबे यांनी गुरुवार (दि.५) पदभार स्वीकारला. या प्रसंगी निलेश बुधवंत, डॉ. महेश शेजाळ, दुर्गेश गायकवाड, लक्ष्मण झांजे, रवींद्र तळपे आदी अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.