दिलीप वळसे पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी बांधला वनराई बंधारा

1 min read

निमगाव सावा दि.४:- श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित, दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, निमगाव सावा (ता. जुन्नर) येथील महाविद्यालयीन राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी ग्रामपंचायत निमगाव सावा सरपंच किशोर घोडे, ग्रामसेवक एस. बी खैरे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र शासनाच्या “पाणी आडवा पाणी जिरवा” उपक्रमांतर्गत निमगाव सावा मधील घोडेमळा येथील ओढ्यावर वनराई बंधारा तयार केला. घोडेमळ्यातील ओढा हा मोठा असून या ओढ्याला सतत पाणी येते व ते सर्व वाहून नदीला जाते. त्यामुळे या ओढ्यावरील पाणी आडविण्याची ग्रामस्थांची इच्छा होती.त्यामुळे राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. नितीन मोजाड यांच्या मार्गदर्शनातून महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना मधील ४७ स्वयंसेवकांनी हा वनराई बंधारा तयार केला. यासाठी साधारणपणे २०० सिमेंटच्या गोण्यांमध्ये वाळू भरून वापरण्यात आल्या. याप्रसंगी निमगाव सावा ग्रामस्थ, सरपंच, ग्रामसेवक, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. राहुल सरोदे, सचिन बेहडे उपस्थित होते. वनराई बंधारा तयार करण्याचे साहित्य ग्रामपंचायत कडून देण्यात आले. या उपक्रमाचे माननीय प्राचार्य डॉ. छाया जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार, संस्थेचे अध्यक्ष संदिपान पवार, सचिव परेश घोडे यांनी कौतुक केले. तसेच अशा उपक्रमांमध्ये ग्रामस्थांनी ही सहभाग घेण्याची अपेक्षा व्यक्त केली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे