मातोश्री संकुलात “स्वच्छताही सेवा” या उपक्रमाअंतर्गत स्वच्छता मोहीम 

1 min read

कर्जुले हर्या दि.२:- राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळ अंतर्गत उपक्रमात स्वयंसेवकांनी “स्वच्छताही सेवा” या उपक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेत मातोश्री शैक्षणिक संकुल कर्जुले हर्या (ता.पारनेर) येथे महाविद्यालय स्वच्छ्ता स्वच्छ करण्यात आला.

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अंतर्गत रस्ते, महाविद्यालय परिसर स्वच्छ व चकाचक करून कचऱ्याची विल्हेवाट लावली.यात संस्थेचे सचिव किरण आहेर, कार्याध्यक्ष डॉ.दीपक आहेर, संचलिका डॉ. श्वेता बरी आहेर, प्रिन्सिपॉल शितल आहेर,

सर्व युनिट चे प्रिन्सिपॉल डॉ.गोरडे, पवार सर,रजिस्ट्रार यशवंत फापाळे, राहुल सासवडे, डॉ धनश्री होळकर, प्रकाश व्यास सर्व स्टाफ व सर्व विद्यार्थी यांनी यात सहभाग घेतला व संपूर्ण परिसर स्वच्छ केला यात. आयुर्वेद महाविद्यालय विद्यार्थांनी स्वच्छ्ता कार्यक्रमाचे नियोजन अतिशय सुंदर केले होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे