समर्थ बीसीएस च्या विद्यार्थ्यांकडून राजुरी येथे ८१२ शेतकऱ्यांची ई-पीक नोंदणी
1 min readराजुरी दि.१२:- शासन निर्देशानुसार प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या पिकाची मोबाईल द्वारे ई-पीक पहाणी करणे बंधनकारक असुन यापुढील सर्व अनुदान किंवा योजनांचा लाभ पीक पाहणी नोंदवली असेल तरच मिळणार आहे. राजुरी गावामध्ये ई-पीक पहाणी व नोंदणी करण्यासाठी सरपंच,उपसरपंच,सर्व सदस्य तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी यांनी एकत्र येऊन समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स बेल्हे (ता.जुन्नर) या महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या ४० विद्यार्थ्यांच्या सहाय्याने ई-पीक पाहणी व नोंदणी करण्यात आली.प्रत्येक मळा,शिवार,वाड्या-वस्त्या या ठिकाणी विद्यार्थ्यांचे गट करुन एकुण ८१२ शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी व नोंदणी करण्यात आली.तलाठी धनाजी भोसले, नितीन औटी,सचिन औटी, अनिल औटी यांनी विद्यार्थ्यांना ई-पीक प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले.सदर ई-पीक नोंदणी प्रक्रिया पुर्ण झाल्याने राजुरी गावातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजना,नुकसान भरपाई,शासन अनुदान,सोसायटी कर्ज,बॅंक कर्ज,तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेता येणार असल्याचे युवानेते वल्लभ शेळके यांनी सांगितले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे विद्यार्थी उपलब्ध करुन दिले म्हणुन विद्यालयाचे प्राचार्य डॉ.लक्ष्मण घोलप सर,राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा.दिनेश जाधव,प्रा.गौरी भोर यांचा ग्रामपंचायती च्या वतीने सत्कार करण्यात आला.कार्यक्रम प्रसंगी सरपंच प्रिया हाडवळे, उपसरपंच माऊली शेळके,ग्रामपंचायत सदस्य शाकिर चौगुले,सखाराम गाडेकर,रंगनाथ पाटील औटी,संदिप औटी,अर्जुन हाडवळे,तलाठी धनाजीराव भोसले,ग्रामविकास अधिकारी एस.आर बाळसराफ,नामदेव घंगाळे,आसिफ पटेल आदी मान्यवर उपस्थित होते.हे अभियान यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी,गणेश हाडवळे,मच्छिंद्र हाडवळे, निलेश हाडवळे,राजेश कणसे,पांडुरंग औटी,स्वप्निल हाडवळे,राहुल हाडवळे,भाऊसाहेब औटी.पंकज गवळी,सुदाम औटी,सचिन गटकळ,शिवराज औटी,समर्थ महाविद्यालयाचे विद्यार्थी,प्रा.रुपेश कांबळे,प्रा.विलास दातीर आदींनी सहकार्य केले.ही मॊहीम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यानी सहकार्य केले त्या संर्वाचे सरपंच प्रिया हाडवळे यांनी आभार मानले.