मीमांसा एज्युकेशन कडून श्री सिद्धिविनायक पब्लिक सिद्धिविनायक पब्लिक स्कूल शिक्रापूरला सर्वोत्कृष्ट सुरक्षित शाळा पुणे पुरस्कार

1 min read

शिक्रापूर दि.११:- ७ ऑक्टोबर शनिवार या दिवशी रेडिसन ब्लू मुंबई येथे मीमांसा एज्युकेशन कडून शिक्रापूर येथील श्री सिद्धिविनायक पब्लिक स्कूल ला सर्वोत्कृष्ट सुरक्षित शाळा म्हणून पुरस्कार प्राप्त झाला. या पुरस्कार सोहळ्याला शाळेचे प्राचार्य गौरव खुटाळ यांनी उपस्थित राहून पुरस्कार स्वीकारला.या शाळेमध्ये नेहमीच अशा प्रकारचे नवनवीन उपक्रम राबवले जात असतात. यापूर्वी शाळेला अनेक पुरस्कार प्राप्त झालेले असून मीमांसा एज्युकेशन दिलेला हा पुरस्कार म्हणजे शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा आहे असे गौरवोद्गार संस्थेचे अध्यक्ष सोमनाथ सायकर, चेअरमन मनीषा सायकर. संचालक साकोरे,अक्षय गायकवाड, विश्वस्त सुरेश शिंदे, महेंद्र पटेल, शीतल सायकर,सपना सायकर यांनी व्यक्त केले.शाळेचे प्राचार्य गौरव खुटाळ व उप-प्राचार्या उज्वला दौंडकर यांनी सर्व संचालक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांच्या सहकार्याने हे शक्य होऊ शकले असे सांगून सर्वांचे आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे