कौशल्यपूर्ण शिक्षण काळाची गरज: अजित डावरे
1 min readबेल्हे दि.११:- समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्युट संचलित समर्थ औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय टी आय) बेल्हे येथे नुकताच विद्यार्थी गुणगौरव व पदवी प्रदान सोहळा संपन्न झाला.कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व सरस्वती प्रतिमा पूजनाने झाली.या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रोफाईव्ह इंजिनीअरिंग प्रा.लि.चाकण चे डेप्युटी जनरल मॅनेजर अजित डावरे तसेच एच आर मॅनेजर किरण थोरात उपस्थित होते.प्रोफाइव्ह इंजीनियरिंग प्रा लि चे डेप्युटी जनरल मॅनेजर अजित डावरे उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की विद्यार्थी हा देशाचा पाया आहे व तो भक्कम करण्यासाठी कौशल्यपूर्ण शिक्षणाची नितांत गरज आहे. कौशल्यपूर्ण शिक्षण ही आजच्या काळाची गरज असून सातत्यपूर्ण प्रयत्न,कष्ट व स्वयंशिस्तीने विद्यार्थी यश मिळवू शकतो. या संकुलातील व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या अनेकविध संधी उपलब्ध आहेत.एच आर मॅनेजर किरण थोरात म्हणाले की, सॉफ्ट स्किल व संवाद कौशल्य ही अत्यंत महत्त्वाची असून ती हस्तगत करण्याचा प्रयत्न करा. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच प्रथम वर्षामध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
विभागनिहाय निकाल पुढीलप्रमाणे:
द्वितीय वर्ष:-इलेक्ट्रीशियन:प्रथम क्र.-विपुल दारोटे
फिटर: प्रथम क्र.-अभय वाळुंज मेकॅनिक मोटार व्हेईकल:प्रथम क्र.-अक्षय कणसे, बिलाल इनामदार
मेकॅनिक रेफ्रिजरेटर ॲण्ड एसी.:प्रथम क्र.- प्रसाद डुकरे कोपा:प्रथम क्र.- तुषार डोंगरे मेकॅनिक डिझेल:प्रथम क्र.-राहुल येवलेवेल्डर (गॅस व विज):प्रथम क्र.- विजय मापारी डिप्लोमा कोर्स इन इलेक्ट्रिशियन:प्रथम क्र.- प्रथमेश आवारी ऑटोमोटिव्ह डेंट रिपेअर:
प्रथम क्र.- विजय गोडसे ऑटोमोटिव्ह पेंट रिपेअर:
प्रथम क्र.-गिरीष कांबळे प्रथम वर्ष – ड्राफ्ट्समन मेकॅनिकल: प्रथम क्र.- आश्विन राऊतइलेक्ट्रिशियन: प्रथम क्र-आर्यन विश्वासराव
फिटर: प्रथम क्र.-दया गुंड मेकॅनिक मोटार व्हेईकल:
प्रथम क्र.-अनिकेत उंडे मेकॅनिक रेफ्रिजरेटर अँण्ड एसी: प्रथम क्र.-पंकज उंडेसर्व यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच मार्गदर्शक शिक्षक,निदेशक अमोल हाडवळे,विलास सोनवणे,महेंद्र न्हावी,विकास कणसे,नबीज शेख,कोंडीभाऊ सहाणे, निकेश औटी,राजेंद्र पाचपुते,स्वप्निल कवडे,अमोल करंजेकर, प्रशांत औटी,अनिल शेळके.नीलिमा औटी,प्राजक्ता बुगदे,शेखर साळवे,अक्षय वाडेकर,कविता बांगर,निलेश औटी यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके, कॅम्पस डायरेक्टर राजीव सावंत,आय टी आय चे प्राचार्य पांडुरंग हाडवळे,उपप्राचार्य विष्णू मापारी,टेक्निकल डायरेक्टर डॉ.चंद्रशेखर घुले.पॉलिटेक्निकचे प्राचार्य अनिल कपिले,उपप्राचार्य संजय कंधारे,क्रीडा संचालक एच पी नरसुडे यांनी यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य विष्णू मापारी यांनी सूत्रसंचालन कोमल शेटे यांनी तर आभार आय टी आयचे प्राचार्य पांडुरंग हाडवळे यांनी मानले.