समर्थ शैक्षणिक संकुलात महाविद्यालय स्तरीय अविष्कार स्पर्धा संपन्न

1 min read

बेल्हे दि.६:- समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग बेल्हे या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये नुकतीच महाविद्यालयस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धा संपन्न झाल्याची माहिती प्राचार्य डॉ.धनंजय उपासनी यांनी दिली.या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण संकल्पनांचा आविष्कार सादर करत सक्रिय सहभाग नोंदवला.
अंतिम वर्षातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनियरिंग या विभागातील सिमरन मोमीन, ऋतुजा डुकरे, अक्षदा सोमवंशी या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या “स्मार्ट एनर्जी मीटर युजिंग आय ओ टी” या संकल्पनेस महाविद्यालयीन अविष्कार स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळाल्याची माहिती शैक्षणिक व संशोधन समन्वयक प्रा.निर्मल कोठारी यांनी दिली.कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागातील ओंकार शिंदे,कुणाल साबळे,युवराज वरपे व अजय शिंदे यांनी तयार केलेल्या “आयडेंटिफायिंग सायकॉलॉजिकल इम्पॅक्ट ऑफ ऑनलाइन गेम्स अँड सोशल मीडिया युजिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स” या संकल्पनेस द्वितीय क्रमांक मिळाला.इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन इंजिनियरिंग या विभागातील सानिका बोडके, प्रतीक्षा फापाळे व सुमित दांगट यांनी तयार केलेल्या “आय ओ टी बेस्ट रेन रूफिंग फॉर क्रॉप प्रोटेक्शन अँड वॉटर मॅनेजमेंट सिस्टीम युजिंग सोलर” या प्रकल्पास तृतीय क्रमांक मिळाला. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉ.महेश भास्कर, प्रा.रुस्तुम दराडे यांनी काम पाहिले.अशा प्रकारच्या संशोधनात्मक स्पर्धेमधूनच विद्यार्थ्याच्या संशोधन वृत्तीचा विकास होत असल्याची माहिती परीक्षक डॉ.महेश भास्कर यांनी दिली.संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके,सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत, अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.धनंजय उपासनी,टेक्निकल डायरेक्टर डॉ.चंद्रशेखर घुले यांनी सर्व यशस्वी व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे