श्रीमती सीताबाई रंगुजी शिंदे महाविद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त विद्यार्थांना मार्गदर्शन

1 min read

बोरी दि.३:- श्रीमती सीताबाई रंगुजी शिंदे महाविद्यालयात बोरी (ता.जुन्नर) महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्ष एस. आर. शिंदे यांच्या हस्ते महात्मा गांधी व शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना दोन्ही नेत्यांच्या जीवनाचा परिचय करून देत त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य टी .डी. गुंजाळ यांनी विद्यार्थ्यांना महात्मा गांधींनी सत्याग्रहाबरोबरच अहिंसेचे तत्त्वज्ञान संपूर्ण जगाला शिकवले याबाबत मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाच्या निमित्ताने संस्थेचे कार्याध्यक्ष सारंग शिंदे, संस्थेचे सचिव विनायक शिंदे, संस्थेचे खजिनदार राजीव शिंदे, संस्थेचे सदस्य मेघश्याम घोलप, सदस्या मीनल शिंदे उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. शिंदे जी.बी. व आभार प्रदर्शन प्रा.मोरे आर.डी. यांनी केले या कार्यक्रमासाठी संचालक पदाधिकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आजी-माजी विद्यार्थी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे