पोद्दार जम्बो किड्स व रेडियन्स इंटरनॅशनल स्कूलमध्ये गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त प्रभात फेरी
1 min readआळेफाटा दि.२:- पोद्दार जम्बो किड्स व रेडियन्स इंटरनॅशनल स्कूल आळेफाटा (ता.जुन्नर) च्या वतीने गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी झाली. शाळेच्या मुख्याध्यापिका मेरी अंजेलीना देवदास व शिक्षक वृंद हांच्या मार्गदर्शनाखाली प्रभात फेरीचे आयोजना करण्यात आले.
प्रभात फेरीमध्ये पालकांनी विद्यार्थ्यानी उत्स्फुर्तपणे सहभाग घेऊन., ‘जय जवान जय किसान’, ‘ महात्मा गांधी की जय’, भारत माता की जय’ अशा घोषणा दिल्या. त्यानंतर गांधीजी व लालबहादुर शास्त्रीं यांच्या प्रतिमेची शाळेच्या पालक समितिच्या सदस्यांच्या हस्तेे पूजा करण्यात आली.
मुख्याध्यापक व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली गांधींजींच्या सत्य, अहिंसा, समता, स्पर्शभावना असे संदेश देणाऱ्या पत्रकाद्वारे विद्यार्थ्यांनी पालकांचे स्वागत केले. त्यानंतर गांधीजीच्या जीवनावर आधारित तसेच गांधीजी व शास्त्रीजी यांच्या कार्याचा आढावा देणाऱ्या चित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. पालकांनी या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद दिला विद्यार्थ्यानी प्रत्येक चित्रांविषयी पालकांना माहिती समजावून सांगितली.
पालक बापूच्या भजनामध्ये देखील सहभागी झाले. शाळेच्या वतीने आयोजीत वेगेवेगळ्या उपक्रमांमध्ये पालकांनी पाल्यासह भाग घेतला.शाळेच्या वतीने आयोजीत ‘हिरवळ वर वाढू या व हिरवळ जपूया ‘या उपक्रमांमध्ये पालकांनी पाल्यासह बिजारोहण केले. तसेंच धोतर घालणे, चष्मा बनवणे, गांधीजींच्या तीन माकडांचे कोडे सोडविणे हे देखीले उपक्रम राबवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.