डॉ.कदम गुरुकुल मध्ये दुसरी प्रतिभा आंतरशालेय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा संपन्न

1 min read

इंदापूर दि.२:- डॉ.कदम गुरुकुल इंदापूर या ठिकाणी दुसरी प्रतिभा आंतरशालेय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा दि. 30 सप्टेंबर 2023 रोजी उत्साहामध्ये पार पडली. डॉ.कदम गुरुकुल चे अध्यक्ष डॉ. एल एस कदम  आणि शैक्षणिक संचालिका डॉ. सविता कदम  यांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा. त्यांचे भविष्य उज्वल घडावे व आदर्श पिढी निर्माण व्हावी या हेतूने वरील स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये डॉ. कदम गुरुकुल, विद्या प्रतिष्ठान सोमेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल सोमेश्वर, प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी, अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूल बारामती, विद्या प्रतिष्ठान डॉ.सायरन पूनावाला स्कूल बारामती, भारत चिल्ड्रन अकॅडमी अँड ज्युनिअर कॉलेज वालचंदनगर, शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल सासवड, या शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा (तीन ग्रुप) मध्ये पार पडली. यामध्ये ग्रुप 1 (इ. तिसरी,चौथी ) ग्रुप 2( पाचवी ते सातवी) ग्रुप 3(आठवी ते दहावी)या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉ. प्रज्ञा गांधी,अनुराधा पवार यांनी (तिसरी व चौथी)च्या विद्यार्थ्यांचे परीक्षण केले. तर डॉ.गणेश मुडेगावकर-संगमेश्वर कॉलेज सोलापूर,वसीम इनामदार- सिंहगड पब्लिक स्कूल सोलापूर यांनी (पाचवी ते दहावी) दोन्ही ग्रुपचे निप:क्षपातीपणे परीक्षण केले. आणि सर्व विजयी विद्यार्थ्यांचे डॉ. कदम गुरुकुल चे अध्यक्ष डॉ. एल एस कदम सर यांनी अभिनंदन केले. तर शैक्षणिक संचालिका डॉ. सविता कदम, प्राचार्य वृंदा मुलतानी जोशी मॅडम, उपप्राचार्य रिशी बासू सर यांनी सर्व विजयी आणि सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बक्षीस देऊन सन्मानित केले. यामध्ये ग्रुप – 1 मध्ये प्रथम- विराज विजय खाडे- प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी, द्वितीय- अनन्या गुरुप्रसाद कामत-अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूल बारामती, तृतीय- आराध्या अतुल जाधव- विद्या प्रतिष्ठान सोमेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल सोमेश्वर. उत्तेजनार्थ 1) ज्योतिरादित्य गणेश जाधव- प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी,2) निधी उदय डांबे-अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूल बारामती. ग्रुप – 2 मध्ये प्रथम- ईश्वरी संतोष हेगडे-डॉ. कदम गुरुकुल इंदापूर, _द्वितीय_- तनिष्का विजय जाधव-देशमुख-प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी. तृतीय- स्वाती पंकज अहिरे- अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूल बारामती. उत्तेजनार्थ1) श्रीशा पंकज गोरे- डॉ. कदम गुरुकुल इंदापूर,2) श्रीजा चंद्रशेखर तांगडे-अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूल बारामती. ग्रुप 3 मध्ये प्रथम-श्रावणी विजयकुमार जगताप-डॉ. कदम गुरुकुल इंदापूर. द्वितीय- वेदांती अमोल मोटे-अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूल बारामती. तृतीय- राजनंदिनी विजय लोभे-पाटील-डॉ. कदम गुरुकुल इंदापूर.उत्तेजनार्थ 1) गायत्री अरुण गोडसे-अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूल बारामती,2) श्रीलेखा संदेश देवकर-डॉ. कदम गुरुकुल इंदापूर. त्याचबरोबर अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूल बारामती या शाळेने फिरता चषक प्रतिभा आंतरशालेय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेचा मिळवून उपस्थितांची मने जिंकली. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्रीराम कवितके यांनी विशेष प्रयत्न केले. उत्कृष्ट सूत्रसंचालन पांडुरंग घाडगे,गणेश घाडगे,सोमनाथ भरगंडे यांनी केले. तर डॉ. कदम गुरुकुलचे सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. आणि ही स्पर्धा यशस्वी झाली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे