मॉडर्नच्या विद्यार्थांची तालुका व जिल्हा क्रीडा स्पर्धांत उत्तम कामगिरी
1 min read
बेल्हे दि.१:- शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे व जुन्नर तालुका क्रीडा शिक्षक संघटना यांच्या अंतर्गत तालुका स्तरीय मैदानी स्पर्धा नुकत्याच ओतूर येथे संपन्न झाल्या.
यात बेल्हे (ता.जुन्नर) येथील मॉडर्न इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज च्या विद्यार्थांनी उत्तम कामगिरी केली असून आठवी ची विद्यार्थिनी हेमाली दळवी हिने १४ वर्ष गटामध्ये १०० मीटर धावणे स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला तर ९ वी ची विद्यार्थिनी मोनिका लहांगे हिने १७ वयोगटा मध्ये ४०० मीटर धावणे या स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला.
तर पुणे या ठिकाणी संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत ९ वी चा विद्यार्थी विपुल सुभाष घुटे याचा १७ वयोगटा मध्ये तिसरा क्रमांक आला असून त्याला कांस्यपदक मिळाले आहे. महेश गुळवे व योगेश शिंदे या शिक्षकांनी सदर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले.
खेळात उत्तम कामगिरी करणाऱ्या या विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक सीए सावकार गुंजाळ, अध्यक्ष गोपीनाथ शिंदे, सीईओ शैलेश ढवळे, सर्व संचालक मंडळ,शिक्षक,पालक तसेच जुन्नर तालुका क्रीडा शिक्षक संघ अध्यक्ष गणेश राऊत यांनी अभिनंदन केले आहे.