शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करा, विनाअनुदानित वरून अनुदानित वर बदली मान्यता द्या:- शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे
1 min readआळेफाटा दि.३०:- शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, विनाअनुदानित वरून अनुदानित वर बदली मान्यता शासन आदेशाला दिलेली स्थगिती उठविणे, कनिष्ठ महाविद्यालयीन उपप्राचार्य पदाला विशिष्ट वेतन वाढ द्यावी.
२० टक्के अनुदानाला पात्र झालेल्या तुकड्यांवरील शिक्षकांच्या शालार्थ आयडी साठी पुणे विभागीय बोर्डाचे सचिव यांनी वर्तमानपत्रातील मूळ जाहिरात, जावक क्रमांक, बिंदू नियमावली याबाबत नियम शिथिल करण्यात यावे अशी मागणी कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी केली आहे.ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळ आळे (ता. जुन्नर) संचलित ज्ञान मंदिर कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी भेट देऊन कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे प्रश्न समजावून घेऊन सविस्तर चर्चा केली. यासंदर्भात आमदार साहेबांनी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या सभेतून शिक्षण उपसंचालक पुणे विभाग मा. राजेंद्र अहिरे यांना फोन लावून सविस्तर चर्चा केली व शालार्थ आयडी चा प्रश्न मार्गी लागेल असे शिक्षकांना सांगण्यात आले.
महाविद्यालयाच्या वतीने शिक्षकांच्या प्रश्नांचे निवेदन आमदारांना देण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी संदीप कालेकर, राजेश म्हस्के, ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष अजय कुऱ्हाडे , संचालक संपत गुंजाळ, बी.आर. सहाणे, कैलास शेळके, सम्राट कुऱ्हाडे, रमेश कुऱ्हाडे
महाविद्यालयाचे प्राचार्य भवारी एस .एस. उपप्राचार्य भालेराव आर्.एल. व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुरेश कुऱ्हाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेचे संचालक मा. किशोर कुऱ्हाडे यांनी केले.