समर्थ फार्मसी महाविद्यालयात जागतिक फार्मासिस्ट दिना निमित्त चरक शुश्रुत व्याख्यानमालेचे आयोजन

1 min read

बेल्हे दि.२८:- समर्थ रूरल एज्यूकेशनल इन्स्टिट्यूट संचलित,समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी आणि समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बेल्हे (ता.जुन्नर) यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक फार्मासिस्ट दिना निमित्त तीन दिवसीय चरक शुश्रुत व्याख्यानमालेचे आयोजन २५ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर २०२३ दरम्यान करण्यात आले. या व्याख्यानमालेचे हे पाचवे वर्ष असल्याचे डॉ. हातपक्की यांनी सांगितले.या व्याख्यानमालेचे उद्घाटन फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष डॉ.सी.के.कोकाटे यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून करण्यात आले. यावेळी इंटीग्राफ फार्मासुटिकल्स चे संचालक डॉ.अभिजीत जोंधळे, डॉ.राजेंद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.डॉ.सी.के.कोकाटे म्हणाले की,नवीन युगातील फार्मासिस्टच्या जडण-घडणीमध्ये फार्मसी क्षेत्रातील भारतातील जुन्या आद्य फार्मासिस्ट एम.एल.श्रॉफ यांचे योगदान मोठे आहे.तसेच इतरही काही जुन्या १९६० च्या दशकातील फार्मसी क्षेत्रातील महान व्यक्तींच्या आठवणींना डॉ.कोकाटे यांनी उजाळा दिला.समाजातील फार्मासिस्ट ची भूमिका काय तसेच फार्मसी क्षेत्रातील करियर च्या नवनवीन संधी याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. इंटीग्राफ फार्मासुटिकल्स चे संचालक डॉ.अभिजीत जोंधळे यांनी फार्मसी क्षेत्रातील उद्द्योजिकता आणि त्यासाठी लागणारे कौशल्य या विषयावर मार्गदर्शन केले.यावेळी त्यांनी स्वयंरोजगाराचे महत्व सांगताना शासनाच्या विविध अर्थसहाय्य योजनेंबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली.डॉ.राजेंद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांना फार्मसी क्षेत्रातील उच्च शिक्षणासाठी लागणारी प्रवेश परीक्षा GPAT संबंधी मार्गदर्शन केले.तसेच विविध उच्च शिक्षणातील संधींची देखील त्यांनी माहिती दिली.यावेळी महाविद्यालयातील उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी करणाऱ्या तसेच आंतरविद्यापीठीय अश्वमेध क्रीडा स्पर्धेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.सदर व्याख्यानमालेसाठी संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत यांनी शुभेच्छा दिल्या. हि व्याख्यानमाला यशस्वी होण्यासाठी दोन्हीही महाविद्यालयांचे प्राचार्य, डॉ.बसवराज हातपक्की व डॉ.संतोष घुले तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे