विद्यानिकेतन संकुलनात गणेशोत्सवा निमीत्त विविध स्पर्धांचे आयोजन
1 min read
साकोरी दि.२७:- विद्यानिकेतन इंटरनॅशनल अकॅडमी आयोजित गणेश मूर्ती बनविणे, मोदक, लाडू बनविणे, गणपती चा मुखवटा बनवणे, गणपती रंगभरण स्पर्धा अशा विविध स्पर्धा आयोजित केल्या गेल्या. या सर्वच स्पर्धेला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद देत सुमारे २०० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. मातीच्या अतिशय सुबक आणि सुंदर गणपती च्या मूर्ती विद्यार्थ्यांनी बनवल्या तसेच उकडीचे, खव्याचे, गव्हाच्या पिठाचे मोदक छोट्या छोट्या बालचमू नी बाप्पाला अर्पण केले. तसेच अतिशय सुरेख आणि आखीव रेखीव गणपती चे मुखवटे विद्यार्थ्यांनी बनवून आणले. तसेच गणपती रंगभरण स्पर्धा देखील या वेळी घेण्यात आली.
विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनेतील रंग बाप्पाला देत बाप्पा चे चित्र अजून आकर्षक बनवले. या सर्व स्पर्धा ह्या मुलांच्या कलागुणांना तर वाव देतात च शिवाय मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकास ही चांगला होतो. यासाठी दरवर्षी विविध स्पर्धेचे नेहमी आयोजन विद्यानिकेतन संकुलनात केले जाते असे संस्थेचे संस्थापक पी. एम साळवे यांनी सांगितले.
स्पर्धेला विद्यानिकेतन संकुलनाचे संस्थापक पी.एम साळवे, इंटरनॅशनल अकॅडमी चे प्राचार्य अमोल जाधव, पूर्व प्राथमिक विभागाच्या प्राचार्या रुपाली पवार (भालेराव), पी.एम हायस्कुलच्या प्राचार्या सुनीता शेगर यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.