समर्थ अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे प्रकल्प स्पर्धेत घवघवीत यश

1 min read

बेल्हे दि.२६:- रांजणगाव इंडस्ट्रीज असोसिएशन (आर आय ए) च्या वतीने इंजिनियर्स डे निमित्त पुणे विभागातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी नुकतेच रांजणगाव येथे प्रकल्प स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या नवनवीन कल्पना तसेच नवउपक्रमशीलतेला इंडस्ट्रीमध्ये वाव मिळावा या हेतूने हि प्रकल्प स्पर्धा आयोजित केली. असल्याची माहिती रांजणगाव इंडस्ट्रीज असोसिएशन चे अध्यक्ष पी.बी.पालेकर यांनी दिली.समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन कॉलेज ऑफ इंजिनियरिंग या अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सदर स्पर्धेमध्ये घवघवीत यश मिळवल्याची माहिती प्राचार्य डॉ.धनंजय उपासनी यांनी दिली.अंतिम वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विभागातील मोनिका खरमाळे, सोनाली नाबगे आणि संकेत लोंढे या विद्यार्थ्यांनी “सलाईन बॉटल लेवल मॉनिटरिंग अँड अलर्ट सिस्टीम” हा प्रकल्प सादर करत तृतीय क्रमांक संपादन केला. तसेच तमन्ना शेख, प्रिया लंघे आणि आशुतोष केंगले या विद्यार्थ्यांनी “गार्बेज सेग्रिगेशन विथ आय ओ टी” हा प्रकल्प सादर केला. सदर प्रकल्पास पाचवा क्रमांक मिळाल्याची माहिती विभाग प्रमुख प्रा.निर्मल कोठारी यांनी दिली.


सदर विद्यार्थ्यांना प्रा.प्रियांका लोखंडे, प्रा.दिपाली गडगे यांनी मार्गदर्शन केले.सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे