विद्यानिकेतन संकुलातील विद्यार्थांनी जादूच्या प्रयोगातून अनुभवले विज्ञानाचे धडे
1 min readसाकोरी दि.२५:- साकोरी (ता.जुन्नर) येथील विद्यानिकेतन संकुलामध्ये गणेश उत्सवानिमित्त जादूगार प्रकाश शिरोळे यांचे जादूचे प्रयोग ठेवण्यात आले होते. यावेळी जादूचे प्रयोग दाखवताना त्या जादू मागे असणारे विज्ञान देखील जादूगर प्रकाश शिरोळे यांनी विद्यार्थ्यांना समजून सांगितले.
सदर कार्यक्रमासाठी विद्यानिकेतन संकुलाचे संस्थापक अध्यक्ष पांडुरंग मनाजी साळवे, विद्यानिकेतन इंटरनॅशनल अकॅडमी साकोरी प्राचार्य अमोल जाधव, पी एम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य सुनीता शेगर मॅडम व विद्यानिकेतन प्री. प्रायमरीच्या प्राचार्य रूपाली भालेराव सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी देखील उपस्थित होते.
जादूचे प्रयोग पाहिल्यानंतर मुलांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले. तसेच जादूच्या माध्यमातून त्यामागचे विज्ञान विद्यार्थ्यांनी समजून घेतले.