गणेशोत्सवानिमित्त विद्यानिकेतन मध्ये व्याख्यानमाला
1 min read
साकोरी दि.२३:- सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील विद्यानिकेतन साकोरी (ता.जुन्नर) संकुलामध्ये विद्यानिकेतन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यानिकेतन व्याख्यानमालीचे प्रथम पुष्प ह.भ.प विशाल महाराज फलके यांनी ‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ या विषयावर सखोल असे मार्गदर्शन केले. तसेच व्याख्यानमालेचे द्वितीय पुष्प डॉ.अनुष्का शिंदे (एम.डी होमिओपॅथी) यांनी ‘तारुण्याच्या उंबरठ्यावर येणाऱ्या समस्या’ याविषयी मार्गदर्शन केले. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पी.एम साळवे, विद्यानिकेतन पी.एम हायस्कूल ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या सुनिता शेगर.
विद्यानिकेतन इंटरनॅशनल अकॅडमीचे प्राचार्य अमोल जाधव, प्री प्राइमरी विभागाच्या प्राचार्या रुपाली भालेराव, आदी सर्व शिक्षक वृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. अतुल बारवे यांनी केले.