आण्याच्या सरदार पटेल हायस्कूलला संगणक संच भेट

1 min read

आणे दि.२३:- आणे पठारावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे काम प्रगतीपथावर असून मिशन जलजीवन अंतर्गत आणे, नळवणे, शिंदेवाडी, पेमदरा गावांना येडगाव धरणाचे पाणी पिण्यासाठी घरोघरी पोहोचविले जाणार आहे, अशी माहिती श्रीबलदेव कंन्ट्रक्शन संगमनेरचे प्रोप्रायटर इंजि.विवेक पानसरे यांनी दिली. सध्याच्या संगणक युगात इंजि.पानसरे यांनी काळाची पावले ओळखून विद्यालयास संगणक संच भेट दिला त्याबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक धोंडीभाऊ शिंदे यांच्या हस्ते श्रीबलदेव कंन्ट्रक्शनचे मॅनेजर सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला.या छोटेखानी संगणक संच प्रदान कार्यक्रम प्रसंगी शा.व्य.समितीचे अध्यक्ष बाळासाहेब दाते,प्रशांत दाते,अॅड.संतोष आहेर,ग्रा.पं.सदस्य जयराम दाते,अजित आहेर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार आहेर यांनी केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे