अंगणात झोपलेल्या ज्येष्ठ नागरिकावर बिबट्याचा हल्ला; जुन्नर तालुक्यात बिबट्याची दहशत वाढली

1 min read

बेल्हे दि.१०:- जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याचे निदर्शनास येत असून
बिबट्याकडून दररोज शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांवरील होणाऱ्या हल्ल्यांमुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. सगळे गावे बिबट्याच्या दहशतीखाली असल्याचे दिसून येत आहे. गुळूंचवाडी जवळील रानवस्तीवर दिवसाढवळ्या बिबट्या आपल्या पिल्लांसह वावरताना दिसून येत आहेत.सोमवार दि.९ रोजी सायंकाळी गुळूंचवाडी येथील धायटेमळा येथे अंगणात झोपलेल्या नामदेव भाऊ काळे (वय ६५) या वृध्द व्यक्तीवर बिबट्याने हल्ला केला. नामदेव काळे यांनी आरडाओरडा केल्यामुळे बिबट्या धूम ठोकून पळाला पण नामदेव काळे यांच्या डोक्याला दुखापत झाली आणि काळे बिबट्याच्या हल्ल्यातून सुदैवाने बचावले.हल्ल्याची माहिती मिळताच वनकर्मचारी जे. टी.भंडलकर आणि वनरक्षक संजय नरळे यांनी ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे आणि वन परिमंडल अधिकारी बेल्हे नीलम ढोबळे यांना दूरध्वनीद्वारे माहिती कळविली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ताबडतोब नामदेव काळे यांना उपचारासाठी बेल्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. पुढील उपचारासाठी त्यांना नारायणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार उपचारासाठी दाखल केले.उपचाराअंती त्यांना घरी सोडण्यात आले.वनरक्षक नरळे आणि वन कर्मचारी जे. टी भंडलकर यांनी ग्रामस्थांना बिबट्या दिसल्यास कशा प्रकारे सावध राहावे त्याबद्दल सविस्तर माहिती दिली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे