इस्रायल आणि हमासमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ गगनाला भिडणार असल्याचं जाणकारांच मत
1 min readपुणे दि.१०:- गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीचे दर कमी होताना दिसत होते. मात्र, ऐन सणासुदीच्या काळात हे दर आता पुन्हा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. इस्रायल आणि हमास या दोन्ही देशांत सध्या तणावाचे वातावरण आहे. मागील दोन दिवसांपासून या दोन्ही देशात युद्ध सुरू आहे. तसेच पॅलेस्टाईन आणि इस्रायल या दोन्ही देशांकडून एकमेकांवर मोठ्या प्रमाणात बॉम्ब हल्ले देखील सुरू आहेत. या युद्धाने जगभरातील इतर देशांची देखील डोकेदुखी वाढवली आहे.इतर देशांप्रमाणेच भारतातील सोने आणि चांदीच्या व्यापारावरही याचा मोठा परिणाम झाल्याचं दिसतंय. बाजारात सध्या सोन्याच्या मागणीत प्रचंड वाढ झाली असल्याने परिणामी यावरील प्रीमियम देखील वाढला आहे. तसेच या युद्धाचा परिणाम शेअर बाजारावर देखील झाल्याचं पाहायला मिळतंय. यामुळे शेअर बाजार देखील चांगलाच कोसळला आहे. आणि हे असाच चालत राहिलं तर सोने, चांदी आणि डॉलरचा आलेख आपल्याला वाढताच पाहायला मिळणार असल्याचं मत जाणकारांनी व्यक्त केलंय.या दोन्ही देशांतील तणावाच्या परिस्थितीमुळे सोन्याच्या प्रीमियममध्ये 700 रुपयांची वाढ होऊन तो प्रति 10 ग्रॅम मागे 2000 रुपये एवढा झाला आहे. हे युद्ध सुरू होण्याच्या पहिले 10 ग्रॅम सोन्याच्या प्रीमियमचा भाव हा 1300 रुपये एवढा होता. युद्धाच्या परिणामामुळे झालेली वाढ लक्षात घेता विविध ठिकाणच्या सोन्या-चांदीच्या डीलर लोकांनी सोन्याची विक्रीच बंद केली आहे.
आतापर्यंतचा इतिहास पहिला तर जगभरात जेव्हा कधी युद्ध झाले आहे त्याचा थेट परिणाम हा सोने, चांदी, तेल आणि इंधनावर झाल्याचं पाहायला मिळालंय. इतर वेळेप्रमाणे यावेळीही इस्रायल आणि हमासमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे सोन्याचे आणि चांदीचे दर गगनाला भिडणार असल्याचं मत जाणकारांनी व्यक्त केलं आहे. या दोन्ही देशांत सुरू असलेल्या युद्धामुळे आर्थिक मंदी येण्याची शक्यता आहे. ज्यावेळेस कोणतेही युद्ध होते किंवा आर्थिक मंदी सदृश परिस्थिती निर्माण होते अशा वेळेस बरेच नागरिक सोन्यात गुंतवणूक करतात. सोन्यात केलेली गुंतवणूक ही सुरक्षित मानली जात असल्याने जवळपास सगळेच नागरिक इकडे वळलेले दिसून येतात. आता सध्या युद्ध सुरू असल्याने बरेच लोक सोने खरेदीला प्राधान्य देताना दिसून येत आहेत. त्यामुळे बाजाराच्या नियमाप्रमाणे जर मागणी वाढली तर वस्तूची किंमतही वाढते. त्यामुळेच सध्या सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. ताईच आंतरराष्ट्रीय बाजारात आणखी काही घडामोडी घडल्यास सोन्या-चांदीसह डॉलरचा भावही वाढू शकतो.