बिबट्याच्या हल्यात चिमुरडा गंभीर जखमी

1 min read

आळेफाटा दि.९:- आळे गावात एका चार वर्षीय बालकावर बिबटयाने हल्ला करून जखमी केल्याची घटना सोमवार दि.९ सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आळे (ता.जुन्नर) गावातील तितर मळ्यात रहात असलेले अमोल भुजबळ यांचा शिवांश हा साडेतीन वर्षाचा मुलगा अंगणात आजोबा बरोबर खेळत असताना. अचानक समोरील उसाच्या शेतातुन आलेल्या बिबट्याने या मुलाला पकडुन उशाच्या शेतात फरफटत नेत असताना या ठिकाणी असलेल्या अविनाश गडगे या तरूणाने मोठी हिम्मत दाखवत बिबट्याच्या मागे पळत जाऊन त्या मुलाला बिबट्याच्या हल्ल्यातुन सोडवले. परंतु या हल्ल्यात लहान बालक गंभीर जखमी झाला असुन त्याच्यावर आळेफाटा येथील एका खाजगी दवाखान्यात उपचार चालु आहे. या आळे परिसरामध्ये चार बिबटे फिरत असल्याने या परिसरात मोठी बिबट्याची दहशत पसरली आहे. या ठिकाणी भर दिवसा दररोज बिबट्याचे दर्शन शेतकऱ्यांना होत असते. वाढत्या बिबट्याच्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांचा जगणं मुश्किल झाल असून दिवसाही बिबट्याच्या दहशतीखाली जगावं लागत आहे. त्यामुळे आळे ग्रामस्थांनी आंदोलन करण्याचा पवित्र घेतला असून लवकरच आळेफाटा चौकामध्ये मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आळे ग्रामस्थांनी दिला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे