शिवसेनेचे माजी पुणे जिल्हाप्रमुख ॲड.अविनाश राहणे काळाच्या पडद्या आड

1 min read

मंचर दि.८:- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख अविनाश राहणे (वय ५८) यांचे दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या अचानक जाण्याने शिवसेना पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात शिवसेना पक्ष वाढीसाठी अविनाश रहाणे यांचे मोलाचे योगदान होते. शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबरीने त्यांनी शिवसेना पक्ष वाढीसाठी तालुक्यात काम केले होते. त्यांनी अनेक शिवसैनिकांना शिवसेनेची जोडले होते.

अविनाश रहाणे यांनी शिवसेना शाखाप्रमुख, तालुकाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, जिल्हाप्रमुख, जिल्हा संघटक, असे एकूण ४० वर्ष शिवसेना पक्ष वाढीसाठी काम केले. तसेच पंचायत समिती सदस्य, दोन वेळा आमदारकी लढवली होती. पुणे जिल्ह्यातील अनेक तरुणांचे ते मार्गदर्शक होते. बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची वेगळी ओळख होती. त्यांच्या जाण्याने शिवसैनिकांना मोठा धक्का बसला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे