‘आयुष्मान भारत’ योजनेमध्ये पुणे जिल्हा पिछाडीवर; आयुष्मान भारत गोल्डन कार्ड काढून घ्या;- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

1 min read

पुणे, दि.८ – पुणे जिल्ह्यात पात्र लाभार्थी १६ लाख ८८ हजार ६८७ आहेत. पण, आतापर्यंत केवळ ४ लाख २६ हजार ३७३ जणांनी आयुष्मान भारत गोल्डन कार्ड काढले असून पुणे जिल्हा पिछाडीवर आलेला दिसून येत आहे.त्यामुळे’आयुष्मान भारत’ पंतप्रधान जन आरोग्य योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी सर्व पात्र लाभार्थीनी ऑनलाइन नोंदणी करावी. त्यांनी आयुष्मान भारत गोल्डन कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे. आयुष्मान भारत योजने अंतर्गत अंगीकृत रुग्णालयात दाखल झालेल्या लाभार्थीला प्रति कुटुंब ५ लाख रुपयांपर्यंत आरोग्य कवच पुरविण्यात येते.

ऑनलाइन कार्ड काढता येणार

गोल्डन कार्ड काढण्यासाठी https://beneficiary.nha.gov.in हे पोर्टल तयार करण्यात आले आहे. यामध्ये लाभार्थी स्वतः कार्ड काढू शकतो. तसेच आशा सेविकांनादेखील हे कार्ड काढण्यासाठी लॉग-इन आयडी देण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्यात १ हजार ९९९ आशा सेविकांमार्फत कार्ड काढता येणार आहे.

योजनेचे फायदे
१) पाच लाख रुपयांपर्यंतच्या रुग्णालयीन खर्चाचा लाभ पॉलिसी वर्षात कुटुंबातील एक किंवा सर्व सदस्य घेऊ शकतात.२) या योजनेत १ हजार २०९ शस्त्रक्रिया, चिकित्सा, उपचार समाविष्ट आहे.३) पुणे जिल्ह्यात ५७ खासगी व १२ शासकीय अशा एकूण ६९ रुग्णालयांचा समावेश आहे.

https://aapkedwarayushman. pmjay.gov.in/AapkeDwar T संकेतस्थळावर लाभार्थी यादी उपलब्ध.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे