गुळूंचवाडीत बिबट्याच्या हल्यात कालवड ठार

1 min read

गुळूंचवाडी दि.५:- गुळूंचवाडी (ता.जुन्नर) परिसरात दिवसेंदिवस बिबट्याचे पाळीव प्राण्यांवर होणारे हल्याचे प्रमाण वाढतच चालले आहे.बुधवार दि.४ रात्री निवृत्ती कुटे यांच्या गोठ्यात घुसून बिबट्याने कालवडीचा फडशा पाडला. सकाळी उठल्यावर कांताबाई कुटे आपल्या गोठ्यात गाईला चारा टाकण्यासाठी गेले असता त्यांना कालवड रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत दिसली. म्हणून त्यांनी पती कुटे आणि शेजारी रभाजी कर्डिले, मारूत्ती कर्डिले, नंदू कर्डिले, भीमराव कर्डिले यांना बिबट्याने हल्ला केल्याची माहिती दिली.

संतोष आग्रे आणि दीपक जाधव यांनी तत्काळ वन कर्मचारी जे. टी. भंडलकर आणि वनरक्षक संजय नराळे यांच्याशी दूध्वनीवरून संपर्क साधला असता वनकर्मचारी जे. टी. भंडलकर आणि वनरक्षक संजय नराळे यांनी ताबडतोब घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. बिबट्याचा गुळुंचवाडी परिसरात राजरोसपणे वावर असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरात पिंजरा लावण्याची आणि बिबट्या जेरबंद करण्याची ग्रामस्थांकडून मागणी करण्यात येत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे