दुचाकीस्वारांवर बिबट्याने घातली झडप; दोघे जखमी

1 min read

निमगाव सावा दि.४ (वार्ताहर – पंढरीनाथ मते) :- जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात बिबट्यांच्या हल्याच्या घटना वाढत असतानाच मंगळवार (दि.३) संध्याकाळी साडे सात निमगाव सावा (ता. जुन्नर) येथील शिवमळा परिसरात रस्त्यावरून जात असताना बिबट्याने हल्ला करून दोघांना जखमी केले आहे.याबाबत माहिती अशी की पांडुरंग निवृत्ती गाडगे व नंदाराम पोपट मते हे दोघे साडे सात वाजण्याच्या सुमारास आपल्या मोटारसायकलवरून शिवमळा परिसरातून जात असताना शेजारील शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला. या हल्यात दोघांच्याही पायांना बिबट्याच्या हल्याने जखमा झाल्या आहेत. ग्रामस्थांनी तातडीने त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे डॉ. यादव यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी नारायणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हलविण्यात आले. उपचारा अंती दोघांना घरी सोडण्यात आले.यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ जमा झाले होते. घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी रामदास शिंदे, गावचे पोलीस पाटील अनिल टांकसाळे उपस्थित होते. तालुक्यात कुठेही बिबट्यांच्या हल्याची घटना घडली की वनविभाग त्या ठिकाणी पिंजरे लावतो परंतु त्यात सावज ठेवत नसल्याने बिबटे पकडले जात नाही. यामुळे ग्रामस्थ व वनविभागाचे अधिकारी यांच्यातील संघर्ष शिगेला पोहचल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. ज्या ठिकाणी हल्ला झाला त्या ठिकानी ग्रामस्थांना पुन्हा बिबट्या आढळून आला. त्यामुळे परिसरात भीतीच वातावरण पसरला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे