उपजिल्हाधिकारी रामदास जगताप – सुसंस्कृत आदर्श अधिकारी आमदार निलेश लंके
1 min read
पुणे दि.३:- ‘जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित सांसद आदर्श ग्राम जांबूतचे सुपुत्र डिजिटल सात बाराचे प्रणेते लोकप्रिय उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांचा पारनेर, शिरुर, जुन्नर, आंबेगाव रहिवासी पुणेकर मित्र परिवार तर्फे जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.दि.२ ऑक्टोबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पुणे येथे आयोजित स्नेहमेळावा व यशवंत सन्मान सोहळ्यात पारनेर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय लोकनेते आमदार निलेश लंके यांचे शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी आमदार निलेश लंके म्हणाले की, गरीबाला न्याय द्या.
वंचितांचे अश्रू पुसा, माणसातला देव शोधा आणि पुण्याचं पारडं जड करा असा कळकळीचा संदेश आपल्या भाषणातून दिला तर रामदास जगताप यांनी आपल्या आव्हानात्मक महसुली सेवाकालाचा आढावा घेत सहकार्य केलेल्यांची कृतज्ञता व्यक्त केली. महसूल विभागाच्या डिजीटल क्रांती ठरलेल्या ई फेरफार प्रकल्पाचा राज्य समन्वयक म्हणून सलग ६ वर्षे केलेले काम निश्चितीच समाधान देणारे होते.
त्यामुळे लाखो नागरिक दररोज लाभ घेत आहेत असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी केले
राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक बाळासाहेब घोडे गुरुजी यांचाही याप्रसंगी सन्मान करण्यात आला. समाजरक्षक पोलीस कर्मचारी अधिकारी तसेच लोकसेवा आयोग परीक्षेत यश मिळवून निवड झालेले अधिकारी, उच्च शिक्षण घेतलेले डॉक्टर्स, पोलिस कर्मचारी आणि शिष्यवृत्ती प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचाही या प्रसंगी सन्मान करण्यात आला.याप्रसंगी शिरुर नगरपालिका माजी नगराध्यक्षा मनिषा गावडे, अनिता रामदास जगताप, सेवानिवृत्त पोलीस उपायुक्त बाबाजी गावडे, जि.प.पुणे सेवानिवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, जनता सह.बँकेचे माजी संचालक बिरु खोमणे, कृषि विकास अधिकारी संजय पिंगट, वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष चव्हाण.
पारनेर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष जितेश सरडे,पुणे मनपा समाज विकास विभाग रामदास धावडे, पुणे मनपा मालमत्ता विभाग पेठ निरीक्षक प्रकाश घोडे,सरपंच नवनाथ निचित, तुकाराम डफळ, महेंद्र पवार, महेंद्र मुंजाळ, अभय नांगरे, संजय भाईक,शहाजी पवार, डॉ भानुदास कुलाळ, रभाजी खोमणे, राहुल घोडे, शिवाजी गावडे, बाबू निचित, सचिन हिलाळ, मल्हारी पवार, भास्कर गांजे, गणेश गवळी यांची उपस्थिती लाभली.
समारंभाचे प्रास्ताविक संभाजी साबळे यांनी करीत उपस्थितांचे स्वागत केले तर सुनिल चोरे यांनी आभार मानले व राजेंद्र शिनारे यांनी सूत्रसंचालन केले.