तळ्याई मित्र मंडळाची पारंपरिक पद्धतीने मिरवणूक

1 min read

गुळंचवाडी दि.२८:- गुळंचवाडी (ता.जुन्नर) तळ्याई मित्र मंडळ देवकर मळा यांच्या वतीने गणपती बाप्पा बसविण्यात आला होता आज बाप्पाचे विसर्जनाच्या निमित्ताने कानठळ्या फोडणारा कर्णकर्कश आवाज करणारा डीजे न लावता पारंपारिक वाद्याच्या गजरात वाजत गाजत आणि गुलालाची उधळण न करता वायुप्रदषण तसेच ध्वनिप्रदूषण न करता साध्या पद्धतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.मिरवणुकीत महिला आपल्या डोक्यावर कलशपात्र घेऊन सहभागी झाल्या होत्या तसेच महिला वर्ग फुगड्या खेळण्याचा आनंद घेताना मिरवणुकीत दिसून येत होत्या. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया, एक दोन तीन चार गणपतीचा जयजकार, गणपती चालले गावाला चैन पडेना आम्हाला, गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा लहान मुलांच्या घोषणांनी परिसर दुमदमून गेला होता.कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते मारुत्ती आग्रे, बळवंत गुंजाळ, सिताराम देवकर, तुकाराम देवकर, कोंडीबा देवकर, रामदास देवकर, लक्ष्मण देवकर, श्रीकृष्ण देवकर, गणेश देवकर, संतू देवकर, बाळासाहेब देवकर, बाबाजी देवकर, म्हताजी देवकर, गणपत देवकर, नाथा देवकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे