वडगाव आनंद येथील हिरकणी महिला लेझीम पथकाची पुणे फेस्टिवल मध्ये डंका
1 min readआळेफाटा दि.२८:-आळेफाटा व वडगाव आनंद येथील हिरकणी महिला लेझीम पथकाची पुणे फेस्टिवलमध्ये बालगंधर्व रंगमंदिर येथे आपली पारंपारिक लेझीम कला सादरीकरण करण्याची संधी मिळाली. ग्रामीण भागातील महिलांना प्रथमताच पुणे फेस्टिवल अंतर्गत बालगंधर्व रंगमंदिर येथे कला सादरीकरण करण्याचा मान मिळाला. ही संधी पुणे फेस्टिवलच्या आयोजिका दीपाली पांढरे, संयोजिता कुदळे व सुप्रिया ताम्हाणे यांनी उपलब्ध करून दिली. काळानुरूप लोप पावत चाललेली संस्कृतीचे जतन करीत ग्रामीण भागतील महिलांनी बालगंधर्व रंगमंदिर येथे अप्रतिम लेझीम नृत्य सादरीकरण करीत उपस्थित पुणेकरांची मन जिंकली. लेझीम पथकाच्या प्रमुख अमृता सुरेश गडगे यांच्या मार्गदर्शनाखाली अश्विनी झांजे, श्रद्धा वाघचौरे, कार्तिकी गडगे, प्राजक्ता चौगुले, कविता गडगे, रुजला वाघ, छाया गडगे, माधवी गडगे, जयश्री वाव्हळ, ज्योती गडगे, अर्चना घोरपडे, समीक्षा पादीर, रोहिणी भुजबळ. लता कालेकर, भाग्यश्री अभंग ह्या महिलांनी लेझीमचे अप्रतिम सादरीकरण केले.पुणे फेस्टिवल आयोजकांच्या वतीने हिरकणी महिला लेझीम पथकाला सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.