रेणुका देवीचा नवरात्र उत्सव आनंदात साजरा; दर्शनाला भाविकांची रीघ

1 min read

सोनपेठ दि.२५:- परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील डिघोळ येथे येथील रेणुका माता देवीच्या शारदीय नवरात्री उत्सव उत्साहात साजरा झाला. यावेळी या उत्सवामध्ये देवीच्या गाण्याचे कार्यक्रम व दररोज महाप्रसादाचा इतर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी डिगोळ येथील रेणुका माता मंदिरातील शारदीय नवरात्र उत्सव आनंदात साजरा झाला.या उत्सवामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिघोळ येथे रेणुका माते मंदिर सोनपेठ पासून परळी कडे मंदिराच्या सुशोभिकरणासाठी कमिटीतर्फे सदैव प्रयत्न करण्यात येत आहेत. मंदिरावर विद्युत रोषणाई सर्वत्र झगमगताना दिसत असून भाविकांनी दर्शनासाठी रीग लावली होती. सोनपेठ तालुक्यात जिल्हा भरातून व महा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक भाविक या देवीच्या दर्शनासाठी येतात. मागील काही वर्षांपासून नवरा नवरात्रो उत्सवात दर्शनासाठी येणारे भाविक भक्तांसाठी अन्नछत्र सुरू आहे. दररोज वेगवेगळ्या अन्नदात्याकडून अन्नदानाची दहा दिवस अखंड सेवा सुरू राहते. देवीच्या समोर दोन कल्लोळ असून पूर्वीच्या काळी देवीच्या मंदिरासमोर पाण्याची सुविधा नसल्याने अनेक भाविक तसेच शाळा महाविद्यालय सहली दर्शन साठी येताना भाजी भाकरी घेऊन येत व दर्शनानंतर देवीच्या प्रांगणात बसून जेवण केल्यानंतर या कल्लोळातील पाणी पिऊन तृप्त होत असतात.

या देवी मंदिरातील स्थापना इसवी सन १६०० मध्ये समर्थ रामदास स्वामी यांनी केली असल्याचे सांगितले जाते या ठिकाणी मोठ्या जत्रेच्या स्वरूप प्राप्त झाल्याचे दिसून येत आहे अनेक वर्ष व्यवसायिकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. निजाम कालखंडापासून देवी मंदिराची देखभाल डिगोळ येथील देशमुख घराणे करत असून आजही विजयकुमार देशमुख रमाकांत देशमुख अण्णासाहेब देशमुख रणजित देशमुख यांना आरती व पूजा शिलंगणाचा मान कायम आहे.

या ठिकाणी पुजारी अंबादास पुजारी अरुण पुजारी गावातील युवा तरुण नागनाथ दादा शिंगाडे डिघोळ गावातील तरुण युवा, सतीश पारेकर,नितीन मुळी, कानिक अन्नपूर्णे,शाम काथवटे, आचारी बालासाहेब बोंबले शेळगावकर, मंडप वाले जब्बार शेख, कृष्णा शिंदे सुभाष मुंडीक लहू सूरवसे आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे