गुळूंचवाडी येथे शारदीय नवरात्रौत्सव सप्ताह उत्साहात संपन्न

1 min read

गुळूंचवाडी दि.२५:- सालाबाद्रमाणे याही वर्षी गुळूंचवाडी (ता.जुन्नर) येथे शारदीय नवरात्रौत्सव निमित्त मळगंगा मातेच्या प्रांगणात सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. सलग दहा दिवस अहोरात्र भजन हरिपाठ प्रवचन आणि कीर्तनाने मळगंगा मातेचा दरबार गजबजून गेला होता.

प्रवचनकार ह.भ.प. जालिंदर म. गुंजाळ, हरिदास म. गुंजाळ, खंडूतात्या गुंजाळ, शशिकांत म. भांबेरे, सुनिल म. बेलकर, गणेश म. कुरकुटे, गणेश म. बेलकर, बाळशिराम म. बांगर यांनी नित्यनेमाने प्रवचन सेवा केली

तसेच कीर्तनकार ह.भ.प. मनोज म. पावशे, जयसिंग म. माळवदकर, अक्षय म. उगले, सचिन म. चकवे, पांडुरंग म. साळुंखे, पांडुरंग म. उगले, नवनाथ म. माशेरे, चिन्मयनंद म. सातारकर, पारस म. मुत्था यांनी कीर्तनसेवा केली.दररोज रात्री किर्तन सेवेनंतर महाआरती करून संपूर्ण गावातील तसेच परिसरातील भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत असते.वारकरी मंडळींसाठी बबन काळे आणि विठ्ठल काळे यांच्यातर्फे दररोज सकाळी न्याहारीची सोय करण्यात आली होती.
सोमवार दि. 23 रोजी सायंकाळी चार वाजता ज्ञानेश्वरी पारायण सांगता करण्यात आली. तसेच गोदी कामगार कॉटन ग्रीन मंडळातर्फे देवीच्या हार कलशाची मिरवणूक काढण्यात आली होती. त्यानंतर दीपोत्सव साजरा करण्यात आला रात्री बारा नंतर देवीचा होमहवन करण्यात आला.मंगळवार दि. 24 रोजी ह. भ. प. उत्तम महाराज बढे यांचे काल्याचे किर्तन झाले.

त्यानंतर देवीची महाआरती झाल्यानंतर महाप्रसादाने सप्ताहाची सांगता करण्यात आली. रात्री सात ते नऊ वेळेत देवीच्या मानाच्या काठीची मिरवणूक काढून शिलांगण वाटप करण्यात आले.आदिशक्ती साऊंड सर्व्हिस गुळुंचवाडी यांच्यातर्फे देवीच्या मंदिरात उत्कृष्ट विद्युत रोषणाई करण्यात आली होती.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे