विद्यानिकेतन साकोरी मध्ये रंगला पारंपरिक भोंडला
1 min readसाकोरी दि.२६:- महाशक्ती अंबाबाई मातेचा जागर म्हणून बालवयातच मुलांवर संस्कार व्हावेत या उद्देशाने विद्यानिकेतन संकुल साकोरी (ता.जुन्नर) मध्ये सरस्वती मातेचे पूजन करण्यात आले.तसेच पाटीपूजन बालचमुंच्या हातून केले गेले. या प्रसंगी या अभिनव उपक्रमाच्या प्रणेत्या पूर्व प्राथमिक विभागाच्या प्राचार्या रुपाली भालेराव यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान विद्यानिकेतन पी.एम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या सुनिता शेगर यांनी भूषविले तसेच विद्यानिकेतन इंटरनॅशनल स्कूल साकोरीचे प्राचार्य अमोल जाधव यांनी आपल्या मनोगतात भारतीय संस्कृती व परंपरा या विषयावर विद्यार्थ्याना संबोधित केले. सर्व विद्यार्थ्यांनी फेर धरून पारंपरिक भोंडला व दांडियाचा आनंद अनुभवला. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. बारवे ए.एस यांनी केले.