सह्याद्रीच्या विद्यार्थीनींनी साकारली देवीची रुपे; नवरात्रात आदिशक्तीचा जागर

1 min read

राजुरी दि.२६:- सह्याद्री व्हॅली पब्लिक स्कूल राजुरी (ता.जुन्नर) मध्ये नवरात्र उत्सव घेऊन आदिशक्ती चा जागर करण्यात आला. शालेय दिवसाची सुरुवात विद्येची देवता सरस्वती देवीची पूजा व आरती करण्यात आली. नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून काही विद्यार्थीनींनी देवीची रुपे साकारली. विद्यार्थीनींच्या रूपातील दुर्गा मातेच्या रूपांची प्राचार्या. रिजवाना शेख यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. नर्सरी ते आठवी च्या सर्व विद्यार्थी व पालकांसाठी दांडियाचे आयोजन करण्यात आले. तसेच पालकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी भरपूर आनंद घेतला. कार्यक्रमाचे आयोजन व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सिद्धेश तापकीर यांनी केले. नवरात्र हा देवी दुर्गा मातेच्या सन्मानार्थ साजरा केला जाणारा एक हिंदू सण आहे. नवरात्र उत्सवाचे महत्व तसेच देवीच्या नऊ रूपांची माहिती शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सांगितली. संस्थेचे चेअरमन व्ही.आर. दिवाकरण सर, पटेल सर, डॉ. भानुशाली, नितीन लोणारी, ॲड. शंकर महाराज शेवाळे, सचिन चव्हाण आणि बलराम सर यांनी विद्यार्थ्यांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे