श्री गणेशा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित वडगाव कांदळी चा बुधवारी भव्य उद्घाटन समारंभ
1 min read
वडगाव कांदळी दि.२५:- श्री गणेशा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित वडगाव कांदळी (ता. जुन्नर) या पतसंस्थेचा उद्घाटन समारंभ बुधवार दिनांक २७ रोजी सकाळी १०.३० वाजता ह.भ.प तुळशीराम महाराज सरकटे व ह.भ.प राजाराम महाराज जाधव यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. अशी माहिती संस्थापक तसेच चेअरमन सुनील देवराम पवार यांनी दिली आहे.
जुन्नर तालुक्यातील तसेच नगर, पुणे जिल्ह्यातील अनेक प्रतिष्ठित मान्यवर या पतसंस्थेच्या उद्घाटनासाठी उपस्थित असणार आहेत.या उद्घाटन समारंभासाठी आपणही उपस्थित राहण्याचे विनंती संस्थेचे चेअरमन सुनील देवराम पवार, व्हाईस चेअरमन रवींद्र बाबाजी वामन, सचिव वर्षा नितीन पिंगळे, संचालक अविनाश पवार, इंद्रभान गायकवाड, विनोद निलख, सोमनाथ रेपाळे, महेंद्र सोनवणे, संचालिका शोभा पाचपुते.
वैशाली शिंदे, जयश्री थोरात यांनी केले आहे. या नवीन संस्थेने सभासदांसाठी आकर्षक सुविधा दिल्या आहेत. यामध्ये आरटीजीएस,NEFT, IMPS, फंड ट्रान्सफर, एसएमएस सुविधा, आवर्तक ठेव खाते, बचत खाते, मासिक व्याज प्राप्ती खाते, मुदत ठेव खाते.
SMS सुविधा तसेच ठेवीवर आकर्षक व्याजदर सुद्धा असणार आहे. जामीन की कर्ज, तारणी कर्ज, बचत गट कर्ज ,वाहन तारणी कर्ज, सोनेतारण कर्ज, ठेव तारण कर्ज अशा विविध मार्गांनी ग्राहकांना कर्ज मिळणार आहे.