समर्थ संकुलातील गणेश मंडळाने घडवले शिवपार्वतीसह अष्टविनायकाचे दर्शन
1 min read
बेल्हे दि.२४:- समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे (ता.जुन्नर) येथील मुलांच्या वसतिगृहामध्ये दरवर्षीप्रमाणे नाविन्यपूर्ण आणि समाजप्रबोधन करणारे देखावे सादर केले जातात. याही वर्षी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी आध्यात्मिक देखावा सादर करत शिवपार्वतीसह गणेश आणि अष्टविनायकांची प्रतिकृती उपलब्ध असलेल्या साहित्यातून निर्माण केलेली आहे.गोमुखातून शिवपिंडीवर होत असलेला संततधार अभिषेक यामुळे साक्षात शिवपार्वतीचे विलोभनीय दृश्य या ठिकाणी पाहायला मिळत आहे. अभियांत्रिकी, फार्मसी, पॉलिटेक्निक, एमबी ए, बीसीएस, आयटीआय, लॉ, जुनियर कॉलेज, आयुर्वेदिक हॉस्पिटल, एडीएमएलटी, एमसीएस, एमसीए, बीबीए, बी कॉम आदी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी हा देखावा सादर केलेला आहे.
विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या कलात्मकतेला त्याचबरोबर अध्यात्मिक दृष्टिकोनाला विज्ञानाची जोड देऊन समाज प्रबोधन करण्यासाठी हे विद्यार्थी एकत्र आलेले दिसून येत आहेत.तरुणांमध्ये असलेली ऊर्जा सार्वजनिक गणेशोत्सव असू द्या किंवा इतर अनेक उपक्रमांच्या माध्यमातून चांगल्या गोष्टीसाठी एकवटली गेली.
तर सुजान तरुण आणि नागरिक बनून देशाचे भविष्य नक्कीच उज्वल होईल असा आशावाद यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष माऊली शेळके यांनी व्यक्त केला.सदर देखावा सादरीकरणासाठी वसतीगृह अधीक्षक डॉ.ज्ञानेश्वर जाधव,क्रीडा शिक्षक डॉ.राजाभाऊ ढोबळे,जगदीश सर,अंकुश कणसे,शिवाजीमामा हाडवळे,बाळुनाना हाडवळे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांनी तयार केलेली हि प्रतिकृती पाहण्यासाठी व त्यांचे कौतुक करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके व सर्व प्राचार्य,विभागप्रमुख,शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी भेट दिली.