राजुरीच्या सुयोग नवतरुण गणेश मंडळाचे ४१ वे वर्ष; मंडळ जपतय साधू संतांच्या देखाव्याची परंपरा

1 min read

राजुरी दि.२४:- सुयोग नवतरुण गणेश मंडळ राजुरी (रानमळा) ता.जुन्नर या मंडळाची सन १९८२ साली स्थापना झाली. हे गणेश मंडळ रामायण, महाभारत, या पासुन संतांची विभूती असे अनेक देखावे बनवत असते. मंडळाची अद्भुत गुहा बनवण्याची परंपरा असून गाव पातळीवर सार्वजनिक उपक्रमात कायम सहभाग असलेलं हे मंडळ आहे.यंदा ह.भ.प. सुरेखाताई शिंदे (वारकरी साहित्य परिषद – महिला अध्यक्ष आंबेगाव तालुका) यांचे शृश्राव्य प्रवचन आयोजित करण्यात आले होते.तसेच मंडळाच्या वतीने यंदा तरुणांना टी-शर्ट वाटप करण्यात आले. दरवर्षी विविध स्पर्धा आयोजन करण्यात येते. लहान मुलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, शालेय वस्तू वाटप, प्रवचन, वेशभूषा स्पर्धा, महाप्रसाद वाटप असे अनेक उपक्रम राबवले जातात. सर्व मंडळातील सभासद पुरुष व महिला मिरवणुकी मध्ये व विसर्जन मिरवणुकीत मोठ्या आनंदा ने सहभाग घेतात. यंदा मंडळाला ४१ वर्ष होऊन सुवर्ण वर्षा कडे वाटचाल सुरू आहे. या मध्ये मंडळाचे संस्थापक, अध्यक्ष राजकुमार औटी, उपाध्यक्ष रवींद्र हाडवळे, सचिव ज्ञानेश्वर हाडवळे, सहसचिव शिवाजी हाडवळे. खजिनदार महेंद्र हाडवळे, विश्वस्त बाळासाहेब हाडवळे, निलेश हाडवळे, शंकर हाडवळे, शिवाजी हाडवळे, शरद हाडवळे, लक्ष्मण हाडवळे असून सल्लागार समितीमध्ये सूर्यकांत औटी, संतोष हाडवळे, भाऊ हाडवळे या मंडळाचे, थोर मोठ्यांचे तसेच लहान मुलांचे फार मोठे योगदान आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे